महाराष्ट्रात काही ठिकाणी बाप्पाच्या विसर्जनाला गालबोट

महाराष्ट्रात काही ठिकाणी बाप्पाच्या विसर्जनाला गालबोट

राज्यभरात लाडक्या गणरायाला निरोप देण्यात आला. यावेळी सगळीकडे उत्साहाचं वातावरण असताना काही ठिकाणी बाप्पाच्या विसर्जनाला गालबोट लागलंय. विसर्जनादरम्यान एकूण 14 जणांचा मृत्यू झालाय.

बुलडाण्यात विसर्जनासाठी गेलेले 2 तरुण  पाण्यात बुडालेत. हे तरुण गणपतीचं विसर्जन करण्यासाठी पाझर तलावात गेले होते. मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने त्यांचा पाण्यात बुडून मृत्यू झालाय.

साताऱ्यात कृष्णा नदी पात्रात दोघांचा बुडून मृत्यू झालाय. पुण्यातल्या जुन्नरमध्ये तीन तर देहूमध्ये एकाचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त होतेय.

तर जालन्यातल्या मोती तलावात बुडाल्याने तिघांचा, जळगावातल्या भडगावमध्ये एकाचा, तर नगरमध्ये प्रवरा नदीच्या पात्रात गणेश विसर्जनासाठी पाण्यात उतरलेले दोघे जण वाहून गेलेत. दरम्यान रायगडमध्येही देवकुंड धबधब्यात बुडून तिघेजण बेपता झालेत. त्यांचा अद्यापही शोध सुरू आहे.

Youtube Link : https://youtu.be/Agop3xvL-Q0

WebTitle : marathi news maharshtra accidents during ganeshotsav 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com