मुंबई - महाविकास आघाडीचा आज पहिलावहिला अर्थसंकल्प विधानसभेत सादर झाला. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी महाराष्ट्राचा अर्थसंकल्प सादर केला.
मित्रपक्षांच्या लोकाभिमुख सरकारचा अर्थसंकल्प मांडण्याची संधी मिळाली म्हणून अजित पवार यांनी सर्वांचे आभार मानलेत. देशात कसोटीचा काळ आहे, आर्थिक मंदीच्या सावटामुळे देशाला गंभीर परिणामांचा सामना करावा लागतोय. त्यामुळे आर्थिक गती, रोजगार निर्मिती याचा आलेख उतरता असल्याचं अजित पवार म्हणालेत. राज्यातील सर्व घटकांचा विकास, तरुणांना रोजगार, आरोग्य सेवा हा संकल्प डोळ्यासमोर अजित पवार यांनी आजचा अर्थसंकल्प सादर केला.
केंद्राकडून GST परतावा मिळण्यास उशीर होतोय त्यामुळे राज्यातील विकास कामं करायला अडचण येतेय. अर्थव्यवस्थेला उत्तेजन देण्याचं आव्हान स्वीकारत पुढील वाटचाल करावी लागणार असल्याचं अजित पवार म्हणालेत. हरिवंशराय बच्चन यांच्या कवितेने अजित पवार यांनी अर्थसंकल्पाची सुरवात केली.
Web Title Maharashtra Budget 2020 Know All Pointers Of Budget Presented By FM Ajit Pawar
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.