महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पात नेमकं काय आहे..?

महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पात नेमकं काय आहे..?

स्मार्ट सिटीच्या योजनेसाठी 1316 कोटींची तरतूद : मुनगंटीवार
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी आवश्यक असलेल्या सर्व परवानग्या मिळाल्या आहेत. त्यासाठी विकासकामे सुरु करण्यात आली आहे. तसेच स्मार्ट सिटीच्या योजनेसाठी राज्य सरकारकडून 1316 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. याशिवाय नागरी पायाभूत सुविधांसाठी ९०० कोटींची तरतूद करण्यात आली आहे, अशी माहिती अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज (शुक्रवार) दिली.

नागरी आरोग्य अभियानासाठी 964 कोटींची तरतूद : मुनगंटीवार
सिंधुदुर्ग जिल्ह्यात मल्टी-स्पेशालिटी हॉस्पिटल बांधण्याचा सरकारचा मानस आहे. त्या दृष्टीने विचार सुरु आहे. नागरी आरोग्य अभियानासाठी 964 कोटींची तरतूद करण्यात आली आहे, अशी माहिती अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज (शुक्रवार) दिली. 

शेतकऱ्यांचे हित जपण्यास आमचे प्राधान्य: सुधीर मुनगंटीवार
"शेतकऱ्यांचे हित हा राज्याच्या प्राधान्यक्रमावरील मुद्दा आहे. यामुळेच आम्ही "छत्रपती शेतकरी सन्मान योजनें'तर्गत क्षेत्राचा विचार न करता सरसकट  कर्जमाफी करण्याचा निर्णय घेतला आहे. आत्तापर्यंत राज्यातील 35 लाख 38 हजार शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ देण्यात आला आहे,'' असे मत अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज (शुक्रवार) महाराष्ट्राचा अर्थसंकल्प मांडताना व्यक्त केले.

राज्यात 6 कौशल्य विद्यापीठांची स्थापना करणार : मुनगंटीवार
स्पर्धा परीक्षांच्या मार्गदर्शनासाठी राज्य सरकारकडून 50 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. तसेच 'स्कील इंडिया'साठी 15 ते 25 वयोगटातील मुलांना कौशल्य प्रशिक्षण देण्यात येणार आहे. याशिवाय पदवीधर तरूणांचे स्पर्धा परीक्षेमध्ये उत्तीर्ण होण्याचे प्रमाण वाढविण्यासाठी जिल्हा स्तरावर स्पर्धा परीक्षा केंद्र स्थापन केली जाणार आहेत. याचबरोबर राज्यात 6 कौशल्य विद्यापीठांची स्थापना केली जाणार आहे, अशी माहिती अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज (शुक्रवार) दिली.

जलयुक्त शिवारासाठी 1500 कोटींची तरतूद : मुनगंटीवार 
सूक्ष्म सिंचनासाठी 432 कोटींची तर विहिरींसाठी 132 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. तसेच राज्यातील जलयुक्त शिवार या योजनेसाठी 1500 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे, अशी माहिती राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज (शुक्रवार) विधानसभेत दिली.

राज्याच्या अर्थसंकल्पात शेतकऱयांना सर्वोच्च प्राधान्य
पुढील वर्षी होऊ घातलेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभेत आज (शुक्रवार) राज्याचा सन 2018-19 या वर्षाचा अर्थसंकल्प सादर केला. आमचे सरकार शेतकऱ्यांना सर्वोच्च प्राधान्य देत आहे, असे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटले आहे.

महाराष्ट्र 'वित्तीय तूट' भरून काढणार तरी कशी?  
वस्तू न सेवा कराची अंमलबजावणी झाल्यानंतर राज्याचा पहिलाच अर्थसंकल्प आज (शुक्रवार) सादर करण्यात आला. या अर्थसंकल्पानुसार राज्याची आर्थिक स्थिती बिकट असून 15 हजार 375 कोटी महसूल रुपये तुटीचा अर्थ संकल्प विधानसभेत सादर करण्यात आला. यावरून राज्याची पुढची वाट बिकट आणि खडतर असल्याचे स्पष्ट झाले आहे. अर्थसंकल्प सादर करताना राज्याला आधार देत सुधीर मुनगंटीवार यांनी खर्चात बचत करून तूट भरून काढण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचे आश्वासन दिले असले तरी इतकी तूट कशी भरून काढणार हा मोठा प्रश्न  आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com