सरकारमध्ये येण्यापूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जवानांवरून राजकारण सुरु केले : तेजबहादूर

सरकारमध्ये येण्यापूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जवानांवरून राजकारण सुरु केले : तेजबहादूर

लखनौ : माझी लढाई या देशातील यंत्रणेविरोधात असून, सरकारमध्ये येण्यापूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जवानांवरून राजकारण सुरु केले आहे. त्यामुळे वाराणसीतील लढाई असली आणि नकली चौकादारामधील असल्याचे, वाराणसीतील समाजवादी पक्षाचे उमेदवार तेजबहादूर यादव यांनी म्हटले आहे.

जवानांना देण्यात येणाऱ्या जेवणाची गुणवत्ता खराब असल्याची तक्रार करणारे आणि सीमा सुरक्षा दलातून (बीएसएफ) हकालपट्टी करण्यात आलेले माजी जवान तेजबहादूर यादव यांना समाजवादी पक्षाने (सप) वाराणसीतून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात रिंगणात उतरविले आहे. मोदींच्या विरोधात वाराणसीमधून काँग्रेसने अजय राय यांना पुन्हा उमेदवारी दिली आहे. 'सप'ने आधी शालि यादव यांना वाराणसीमधून उमेदवारी देण्याची घोषणा केली होती, मात्र मोदींच्या विरोधात आता बीएसएफचे माजी कॉन्स्टेबल तेजबहादूर यादव हे उमेदवार असतील, असे "सप'कडून जाहीर करण्यात आले. 'सप'ने उत्तर प्रदेशात बहुजन समाज पक्ष आणि राष्ट्रीय लोक दलाबरोबर आघाडी केली आहे. वाराणसीमध्ये सातव्या टप्प्यात 19 मे रोजी मतदान होणार आहे.

बीएसएफमध्ये असताना यादव यांना जम्मू आणि काश्‍मीरमध्ये नियंत्रण रेषेला लागून असलेल्या पर्वतीय भागात तैनात करण्यात आले होते. बीएसएफच्या जवानांना अतिशय वाईट दर्जाचे अन्न देण्यात येते, असा आरोप यादव यांनी केला होता. त्याबाबतचा एक व्हिडिओही त्यांनी सोशल मीडियावर अपलोड केला होता. त्यानंतर शिस्त मोडल्याचे कारण देत यादव यांची बीएसएफमधून हकालपट्टी करण्यात आली होती. 

तेजबहादूर म्हणाले, की भ्रष्टाचाराचा मुद्दा उपस्थित केल्यामुळे माझी बीएसएफमधून हाकालपट्टी करण्यात आली. त्यामुळे आता संरक्षण दलांमधून भ्रष्टाचार संपूर्णपणे निपटून काढण्याचे माझे ध्येय आहे. आपल्या देशात लष्कराला सन्मान दिला जातो. मात्र, मोदींनी लष्कराच्या नावावर नागरिकांची दिशाभूल केली. गेल्या दहावर्षांपेक्षा मागील वर्षभरात सर्वांत जास्त जवान हुतात्मा झाले आहेत. निमलष्करी दलातील 997 जवानांनी गेल्या वर्षभरात आत्महत्या केली आहे, याला फक्त मोदी जबाबदार आहेत. असली चौकीदार विरुद्ध नकली चौकीदार असाच मी प्रचार करत आहे.

Web Title: SP candidate from Varanasi Tej Bahadur Yadav Says I am confident of winning against Narendra Modi

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com