कोल्हापुरात आंदोलक महिलांनी खासदारांसमोरच घेतल्या नदीत उड्या

कोल्हापुरात आंदोलक महिलांनी खासदारांसमोरच घेतल्या नदीत उड्या

कोल्हापूर : काही दिवसांपुर्वी कोल्हापूर सांगलीला पुरानं घेरलं होतं. आणि यात अनेक कुटुंबांचे संसार उद्धवस्त झाले होते. त्यासाठी आता त्या पूरग्रस्तांना मदत मिळवण्यासाठी मोठ्या प्रमाणात संघर्ष करावा लागतोय. मात्र प्रशासन कोणत्याही प्रकारची दखल घेत नसल्याचं सध्या चित्र दिसतंय. याचसाठी आता पूरग्रस्त महिलांनी कर्जमुक्तीसाठी आंदोलन करायला सुरुवात केलीय. गेल्या 3 दिवसांपासून हे आंदोलन सुरु आहे. मात्र प्रशासन ढिम्मच प्रतिसाद देत असल्यानं या महिलांनी आक्रमक पवित्रा घेतलाय. 

मात्र कर्जमुक्तीसाठी सुरु असलेलं हे कोल्हापुरातलं महिलांचं आंदोलन चिघळलं आहे. मायक्रोफायनान्सच्या कर्जमुक्तीसाठी पूरग्रस्त महिला आंदोलन करत होत्या. गेल्या ३ दिवसांपासून त्यांचं हे आंदोलन सुरु आहे.

दरम्यान या महिलांची भेट घेण्यासाठी आज धैर्यशील माने आंदोलनस्थळी पोहचले. यावेळी महिलांनी आपल्या व्यथा खासदार मानेंसमोर मांडल्या. आणि याचवेळी त्यातील काही आंदोलक महिलांनी थेट पंचगंगेच्या पाण्यात उड्या घेतल्या. यानंतर स्थानिकांनी तातडीनं नदीत उड्या मारत या महिलांना वाचवलं. मात्र या महिला त्यावेळी आक्रमक असल्यानं तिथल्या सुरक्षा रक्षकांनी त्या महिलांना तातडीनं बाहेर काढलं. 
 

Web Title -  Marathi news kolhapur womans agitation 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com