कोकण रेल्वेत फुकट्या प्रवाशांची गर्दी वाढली 

कोकण रेल्वेत फुकट्या प्रवाशांची गर्दी वाढली 

मुंबई : कोकण रेल्वेतील विनातिकीट प्रवाशांचे प्रमाण वाढले असून, एप्रिल ते ऑक्‍टोबरपर्यंत 33 हजार 840 जणांकडून एक कोटी 87 लाखांचा दंड वसूल करण्यात आला. एकूण एक हजार 721 तिकीट तपासनीस आणि सुरक्षारक्षकांमार्फत कोकण रेल्वेवर विशेष मोहीम सुरू आहे. 

गणपती, नवरात्र, होळी, उन्हाळी सुटी अशा काळात कोकण रेल्वेवर चाकरमान्यांची गर्दी उसळते. कोकणातील पर्यटनाला चांगले दिवस आल्यामुळेही रेल्वेगाड्यांतील गर्दी वाढू लागली आहे. या वाढत्या गर्दीचा गैरफायदा घेणाऱ्या फुकट्या प्रवाशांचे प्रमाणही वाढत आहे. अशा विनातिकीट प्रवाशांवर कारवाईची मोहीम कोकण रेल्वेकडून सुरू आहे. कोकण रेल्वेच्या एक हजार 721 भरारी पथकांनी मागील सात महिन्यांत रोहा ते ठोकूर या स्थानकांदरम्यान, सुमारे 33 हजार 840 फुकट्या प्रवाशांना पकडून एक कोटी 87 लाखांचा दंड वसूल केला.

तुतारी आणि कोकणकन्या एक्‍स्प्रेस या रात्रीच्या गाड्यांमध्ये फुकटे प्रवासी जास्त असल्याचेही आढळले आहे. पुढील काळात ही मोहीम सुरूच राहणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. 


Web Title: Kokan railway fined to passengers
 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com