Loksabha 2019 : जळगावात स्मिता वाघ, गुलाबराव देवकरांमध्ये चुरशीची लढत

Loksabha 2019 : जळगावात स्मिता वाघ, गुलाबराव देवकरांमध्ये चुरशीची लढत

जळगाव : जळगाव लोकसभा मतदार संघात भारतीय जनता पक्षाने आमदार स्मिता वाघ यांना उमेदवारी जाहिर केली आहे. स्वातंत्र्यानंतर प्रथमच जळगाव लोकसभा मतदार संघात राष्ट्रीय पक्षातर्फे महिलेला उमेदवारी देण्यात आली आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस व कॉंग्रेस आघाडीतर्फे माजी मंत्री गुलाबराव देवकर यांची उमेदवारी अगोदरच घोषित झाली आहे. नगरसेवकपदापासून राजकारणात देवकर यांनी तर विद्यार्थी दशेतच अखिल भारतीय विद्यार्थी परिषद व नंतर भाजपत जिल्हा परिषद अध्यक्षपद व आमदार असे राजकारणाचे धडे आमदार स्मिता वाघ यांनी गिरविले आहेत. त्यामुळे दोन्ही उमेदवारात चुरशीची लढत होणार आहे. 

जळगाव लोकसभा मतदार संघात भारतीय जनता पक्षाचे खासदार ए. टी. पाटील होते. मात्र भारतीय जनता पक्षाने त्यांचे तिकीट कापले. विधान परिषदेच्या विद्यमान आमदार स्मिता वाघ यांना अधिकृत उमेदवारी जाहिर केली आहे. त्यांना राजकारणाचा चांगला अनुभव विद्यार्थी असतानाच त्यांनी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेत काम केले आहे. त्यानंतर त्या भारतीय जनता पक्षाच्या सक्रिय सदस्या झाल्या अमळनेर तालुक्‍यातील डांगरी गटातून त्या निवडून गेल्या. जिल्हा परिषद अध्यक्ष म्हणूनही त्यांनी आपल्या कामाची वेगळी छाप पाडली आहे. तर भाजप महिला आघाडीचे अध्यक्षपदही त्यांनी भूषविले आहे. महिला आघाहीच्या माध्यमातून त्यांनी महिलासाठी कार्य केले. 2014 मध्ये राज्यात भारतीय जनता पक्ष व शिवसेना युतीचे सरकार आल्यानंतर पक्षात केलेल्या कार्याची दखल घेवून त्यांना विधानपरिषदेचे सदस्य करण्यात आले. त्यांचे पती उदय वाघ हे सुध्दा अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतूनच राजकारणात आले आहे. ते भाजपचे जिल्हाध्यक्ष आहेत. 

राष्ट्रवादी काँगेस व काँग्रेस आघाडी उमेदवार गुलाबराव देवकर याचांही राजकारणात चांगलाच दबदबा आहे. जळगाव नगरसेवकपदापासून त्यांनी राजकारणात सुरूवात केली. जळगावचे ते नगराध्यक्ष होते, सन 2009 मध्ये त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे जळगाव ग्रामीण मतदार संघातून निवडणूक लढविली, शिवसेनेचे उपनेते व खानदेशची मुलूख मैदान तोफ म्हणून ओळख असलेल्या गुलाबराव पाटील यांचा त्यांनी पराभव केला. त्यावेळी आघाडीचे सरकार असल्याने पहिल्याच वेळी आमदार झालेल्या देवकरांना राज्यमंत्रीपदाची तसेच जळगावच्या पालकमंत्रीपदाची संधीही ही मिळाली. या मंत्रीपदाचा उपयोग करीत त्यांनी जळगाव ग्रामीण मतदार संघात कामे केली, मात्र घरकुल प्रकरणात त्यांना कारागृहात जावे लागल्याने सन 2014च्या निवडणूकी त्यांनी तेथूनच लढविली परंतु त्यांना पराभव पत्करावा लागला व पुन्हा गुलाबराव पाटील जळगाव ग्रामीणमधून निवडून आले. पराभव झाल्यानंतरही त्यांनी आपल्या मतदार संघाशी संपर्क कायम ठेवला आहे. त्यांनी पुन्हा विधानसभेची तयारी सुरू केली होती मात्र पक्षाचे नेते शरद पवार यांनी त्यांच्या कार्यावर विश्‍वास व्यक्त करीत त्यांना जळगाव लोकसभेची उमेदवारी दिली आहे. 

भाजपच्या आमदार स्मिता वाघ व राष्ट्रवादी काँग्रेसचे गुलाबराव देवकर यांची राजकीय स्थिती पाहता जळगावातील लढत ही अत्यंत चुरशीची होण्याची शक्‍यता आहे. मराठा बहुल असलेल्या मतदार संघात दोन्ही उमेदवार मराठा आहेत व दोन्ही उमेदवारांचे नातेवाईक मतदार संघात आहेत. देवकर यांचा जनसंपर्क चांगला आहे, शांत स्वभाव व स्मितहास्य यामुळे प्रत्येकाशी त्यांचा स्नेह आहे. मात्र राष्ट्रवादी कॉंग्रेस व कॉग्रेस पक्षात असलेला संघटन कौशल्याचा अभाव ही कमकुवत बाजू आहे. त्यावर ते कसे मात करतात हे पहावे लागणार आहे.भाजप बुथ प्रमुख व मतदार यादींचे बुथप्रमुखापर्यंत संघटन ही जमेची मोठी बाजू आहे तसेच आमदार स्मिता वाघ यांचाही जनसंपर्क मोठा आहे, जिल्हा परिषद अध्यक्ष व आमदार पदामुळे त्यांचा ग्रामीण भागावर त्यांची पकड आहे. त्याचे पती उदय वाघ पक्षाचे जिल्हाध्यक्ष असल्याने त्याचाही त्यांना फायदा होईल.मात्र भाजपतूनच मोठ्या प्रमाणात अंतर्गत उदय वाघ यांच्यावर नाराजी आहे, ही नाराजी दूर करून यश मिळविण्याचे त्यांच्यासमोर आव्हाण असणार आहे.

Web Title: BJP candidate Smita Wagh contest against NCPs Gulabrao Devkar in Jalgaon

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com