…तर भारत पाकला नष्ट करून टाकेलः परवेझ मुशर्रफ

…तर भारत पाकला नष्ट करून टाकेलः परवेझ मुशर्रफ

नवी दिल्लीः जम्मू-काश्मीरमधील पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानची चोहूबाजूंनी कोंडी झाली आहे. पाकिस्तानचे माजी राष्ट्रपती परवेझ यांनीही भीती व्यक्त केली आहे. पाकिस्तानने जर भारताविरोधात पहिला अण्वस्त्राचा वापर केला तर भारत 20 अणूबॉम्ब टाकून पाकिस्तानला संपवून टाकेल, असे मुशर्रफ यांनी म्हटले आहे.

पाकिस्तानमधील 'डॉन' या वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, 'भारत-पाकिस्तान संबंध धोकादायक वळणावर येऊन पोहोचले आहेत. दोन्ही देश अण्वस्त्रांचा वापर करणार नाहीत. पण, पाकिस्तानने भारताविरोधात अण्वस्त्र वापरले तर भारत 20 अणूबॉम्ब टाकून पाकिस्तानला नष्ट करून टाकेल, अशी भिती मुशर्रफ यांनी संयुक्त अरब अमिरातीमध्ये बोलताना व्यक्त केली.'

सध्याची परिस्थिती पाहता पाकिस्तानने भारतावर पहिला हल्ला करावा, हा एकमेव तोडगा आहे. पाकिस्तानने भारतावर 50 अणूबॉम्ब टाकले तरच भारत 20 अणूबॉम्ब वापरण्याच्या स्थितीमध्ये राहणार नाही. पण, तुम्ही पहिला अण्वस्त्र हल्ला करण्यासाठी तयार आहात का? असा प्रश्नही मुशर्रफ यांनी उपस्थित केला.

मुशर्रफ यांनी गेल्या आठवडयात पुलवामा दहशतवादी हल्ल्यात हुतात्मा झालेल्या 'सीआरपीएफ'च्या जवानांबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मनात कुठल्याही भावना नाहीत. त्यांच्यामध्ये कुठलीही आग नसल्याचा आरोप केला होता. शिवाय, पंतप्रधान इम्रान खान यांचे समर्थन करताना पाकिस्तान दहशतवाद्यांना आश्रय देतो हा भारताचा आरोप त्यांनी फेटाळून लावला होता.

'पूलवामा येथे झालेला दहशतवादी हल्ला खूप भयानक होता. पण त्यामध्ये पाकिस्तान सरकार सहभागी आहे, असे म्हणता येणार नाही. पूलावामाची घटना खूप भीषण आणि दु:खद आहे. जैश-ए-मोहम्मदचा म्होरक्या मसूद अजहरबद्दल मला कुठलीही सहानुभूती नाही. त्याने मला सुद्धा मारण्याचा प्रयत्न केला होता. पण म्हणून पाकिस्तान सरकार पुलवामाच्या हल्ल्यामध्ये सहभागी आहे, असा त्याचा अर्थ होत नाही.' असेही मुशर्रफ म्हणाले होते.

दरम्यान, मुशर्रफ यांनी 2016 मध्ये पाकिस्तान देश सोडला आहे. सध्या ते दुबईत राहतात. त्यांच्या विरोधात राजद्रोहाचा खटला सुरू आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com