आता रोबो करणार भारताच्या शत्रुंशी सामना

आता रोबो करणार भारताच्या शत्रुंशी सामना

अनेक  चित्रपटांमध्ये आपण पाहिलं असेल की रोबो अगदी अचूक लक्ष्यभेद करतो, कुठल्याही वातावरणात, भूभागावर वावरतो. अगदी असाच रोबो आता भारतीय विद्यार्थ्यानं तयार केलाय. शत्रूराष्ट्रासाठी ही धोक्याची घंटा आहे. तर आपल्या एकाही जवानाची आहुती न देता शत्रूला काबूत आणता येईल.

आता भारताच्या शत्रूंचं काही खरं नाही. कारण भारतीय विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या एका रोबोमुळे शत्रूचा लक्ष्यभेद करणं सहज शक्य होणारेय.

आयआयटीच्या इलेक्ट्रिकल इंजिनीयरिंगच्या चौथ्या वर्षाला शिकत असलेल्या एका विद्यार्थ्यानं हा रोबो तयार केलाय. या रोबोच्या करामती पाहा. त्यात बसवलेल्या सेंसर्समुळे हा रोबो कोणत्याही अडचणींतून अगदी सहजपणे मार्ग काढतो.

एकदाही या रोबोचा नेम चुकत नाही. कारण त्यात तीन कॅमेरे लावलेत. त्याशिवाय त्यात इनकोडर, सेन्सर्स लावलेत. त्यामुळे समोरच्या लक्ष्याच्या हालचाली अगदी सहजपणे टिपणं या रोबोला शक्य होतं आणि त्याचा वेध घेता येतो.

कॅनडात नुकत्याच झालेल्या रोबोमास्टर स्पर्धेत या रोबोची चांगलीच तारीफ झाली. सूर्यांश अगरवाल नावाच्या विद्यार्थ्यानं हा रोबो तयार केलाय. डीआरडीओनंही या रोबोसाठी वापरण्यात आलेल्या तंत्राचं कौतुक केलंय. भारताच्या संरक्षणासाठी अशा प्रकारचं तंत्र उपयुक्त ठरेल हे नक्की.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com