तुमच्याकडे SBI चं ATM आहे ? मग, ही बातमी वाचाच

तुमच्याकडे SBI चं ATM आहे ? मग, ही बातमी वाचाच

नवी दिल्ली - जर तुम्ही अजूनही मॅग्नेटिक स्ट्रीप (चुंबकीय पट्टी) असलेले कार्ड वापरात असाल तर ते लवकरच 'ईएमव्ही' कार्डाच्या माध्यमातून बदलून घेणे गरजेचे आहे अन्यथा येत्या 28 नोव्हेंबर पासून तुमचे डेबिट कार्ड बंद करण्यात येणार आहे. देशातील सर्वात मोठी सार्वजनिक बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाने आपल्या ग्राहकांना अशा प्रकारचा मेसेज मोबाईलवर पाठवून 'अलर्ट' करण्यात येत आहे. 

'ग्राहकांना चांगली सेवा आणि सुरक्षा देण्यासाठी बँकेकडून हे पाऊल उचलण्यात आलं आहे. 28 नोव्हेंबर 2018 पासून SBI चं मॅजिस्ट्रिप डेबिट कार्ड ब्लॉक होईल. तुमच्या पत्त्यावर पाठवण्यात आलेलं ईएमव्ही कार्ड लवकर सुरू करा,' असं SBI ने पाठवलेल्या मेसेजमध्ये म्हटलं गेलं आहे.

भारताची मध्यवर्ती बँक, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (आरबीआय) या संदर्भातील एक परिपत्रक जाहीर केले असून, ज्या डेबिट किंवा क्रेडिट कार्डवर मॅग्नेटिक स्ट्रीप (चुंबकीय पट्टी) आहे अशी कार्ड 31 डिसेंबर 2018 पर्यंत 'ईएमव्ही' कार्डाच्या माध्यमातून बदलून देण्यास भारतातील सर्व बँकांना सांगण्यात आले आहे. सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून हे कार्ड अधिक सक्षम असणार आहे. 'स्किमिंग किंवा क्लोनिंग'च्या माध्यमातून होत असणाऱ्या गैरव्यवहारांना आळा घालण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे. 

WebTitle : marathi news important news regarding sbi ATM cards 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com