सरकारी कर्मचाऱ्यांना 8 तासांऐवजी 9 तास ड्युटी

सरकारी कर्मचाऱ्यांना 8 तासांऐवजी 9 तास ड्युटी

नवी दिल्ली: सरकारी कर्मचाऱ्यांचा ताण आता वाढवणार आहे. आधीच सरकारी कर्मचाऱ्यांच्या कामाबाबत तक्रारी असतात आणि आता प्रशासनाने एक निर्णय घेतल्याने कर्मचारी चांगलेच अडचणीत सापडले आहेत.

हा निर्णय म्हणजे, केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या काम करण्याच्या तासात आता वाढ होणार आहे. सरकारी कर्मचाऱ्यांसाठी कामाचे 8 तासांऐवजी 9 तास करण्याचा प्रस्ताव केंद्रीय श्रम मंत्रालयाने तयार केलाय. पुढील महिन्यात या प्रस्तावाची अंमलबजावणी होण्याची शक्यताय. सरकारी कर्मचाऱ्यांसाठी तयार करण्यात आलेल्या वेतन संहिता मसुद्यात, दैनंदिन कामाचे तास आठ ऐवजी नऊ करण्यात आले. कर्मचाऱ्यांच्या किमान वेतनाबाबत मात्र श्रम मंत्रालयाने या मसुद्यात शिफारशी केलेल्या नाहीत. किमान वेतनाबाबतचा निर्णय तज्ज्ञ समिती घेणार आहे. 

मात्र या निर्णयाला कामगार संघटनांकडून विरोध होऊ शकतो. प्रस्तावित कामगार कायदा सदोष असल्याचे सांगत कामगार संघटनांनी या कायद्याच्या मसुद्याला विरोध केला आहे. त्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघांशी संबंधित भारतीय मजदूर संघाचाही समावेश आहे. येत्या आठवडाभरात या मसुद्यातील दोषांचे मुद्देसूद टिपण कामगार मंत्रालयापर्यंत पोहोचविण्याचा कामगार संघटनांनी ठरविले आहे. 'या कायद्यात अनेक चुका आहेत. त्या सुधारणे आवश्यक आहे. या कायद्यांतर्गत येणाऱ्या चार कायद्यांतील तरतुदींबाबत नव्या मसुद्यात काहीही भाष्य करण्यात आलेले नाही,' असे भारतीय मजदूर संघाचं म्हणणं आहे.

आता यावर नेमका काय तोडगा निघतो ते पाहणं महत्वाचं ठरेल.

Web Title - governement workers working hours will changed

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com