गौरी लंकेश हत्या प्रकरणात SIT चा मोठा खुलासा

गौरी लंकेश हत्या प्रकरणात SIT चा मोठा खुलासा

पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्त्या गौरी लंकेश यांची हत्या परशुराम वाघमारेनेच केल्याचा दावा एसआयटीनं केलाय..महत्वाचं म्हणजे गौरी लंकेश, कॉम्रेड गोविंद पानसरे आणि एम. एम. कलबुर्गी या तिघांची हत्या करण्यासाठी एकाच शस्त्राचा वापर करण्यात आल्याची महत्वपूर्ण माहिती एसआयटीच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं दिलीय.

तिन्ही हत्यांसाठी वापरण्यात आलेलं पिस्तूल एकच असून त्यातील गोळ्यांवर एकसारख्याच असल्याचं फॉरेन्सिक चाचणीतून आढळून आलंय..गौरी लंकेश हत्येप्रकरणी एकूण सहा जणांना अटक करण्यात आली असून परशुराम वाघमारेची अटक निर्णायक ठरल्याचं सांगण्यात आलंय.

मध्य प्रदेश, गुजरात, महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटक या राज्यांमध्ये उजव्या विचारधारेसाठी काम करणारी एक कट्टरपंथी टोळी सक्रिय आहे. या टोळीकडूनच या तिन्ही हत्या घडवून आणण्यात आल्या.या टोळीत किमान ६० सदस्य सक्रिय आहेत. यातील अनेक जण सनातन संस्था आणि हिंदू जनजागृती समितीशी संबंधित आहेत असं एसआयटीच्या अधिकाऱयांनी नमूद केलंय़.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com