भाजपमध्ये पार पडली मेगाभरतीची पहिली फेरी; अजूनही इनकमिंग सुरू राहणार..

भाजपमध्ये पार पडली मेगाभरतीची पहिली फेरी; अजूनही इनकमिंग सुरू राहणार..

मुंबईच्या गरवारे क्लबमध्ये भाजपमधल्या मेगाभरतीचा पहिला अंक पार पडलाय. या भरती प्रक्रियेद्वारे राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते मधुराव पिचड, अकोलेचे आमदार वैभव पिचड, राष्ट्रवादीचे साताऱ्याचे आमदार शिवेंद्रराजे भोसले, नवी मुंबईतील राष्ट्रवादीचे आमदार संदीप नाईक आणि काँग्रेसचे वडाळ्याचे आमदार कालिदास कोळंबकर यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. याशिवाय राष्ट्रवादीच्या माजी महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ, आणि महात्मा फुले यांच्या वंशज असलेल्या नीता होले तसंच माजी आयपीएस अधिकारी साहेबराव पाटील यांनीही  भाजपमध्ये प्रवेश केलाय. 

मात्र भाजपच्या आक्रमक रणनितीमुळे शिवसेनेतही अस्वस्थता पसरलीय. याशिवाय भाजपच्या या प्रवेशामुळे खुद्द भाजपमध्येच नाराजीची लाट पसरलीय. पिचड यांच्या भाजप प्रवेशाचा जाहिर निषेध नगरमधील भाजपच्या स्थानिक नेत्यांनी केलाय. तर आमदार संदीप नाईक यांच्या प्रवेशामुळे तसंच भविष्यात गणेश नाईक यांच्या प्रवेशाच्या शक्यतेमुळे नाराज आमदार मंदा म्हात्रेंनी उघडपणे आपली नाराजी व्यक्त केलीय. 

राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या बड्या नेत्यांना गळाला लावत असल्याबद्दल जरी भाजपचे नेते स्वत:ची पाठ थोपटून घेत असले तरीही भाजप नेत्यांचा हा आनंद क्षणभंगूर ठरू शकतो. कारण तिकीट वाटपाच्या वेळी निष्ठावंत विरूद्ध उपरे असा संघर्ष निर्माण झाल्यास त्याचा फटका भाजपला निवडणुकीत बसण्याची शक्यता आहे.

WebTitle : marathi news first phase of mass defection done in the presence of devendra fadanavis 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com