'औरंगाबाद' रेल्वे स्थानकाच नाव 'संभाजीनगर' करण्याचा प्रयत्न

'औरंगाबाद' रेल्वे स्थानकाच नाव 'संभाजीनगर' करण्याचा प्रयत्न

औरंगाबाद : औरंगाबाद रेल्वे स्थानकावरील नावाच्या पाटीवर पिवळा रंग टाकून औरंगाबाद हे नाव पुसण्याचा आणि त्या ठिकाणी संभाजीनगर लिहिण्याचा प्रकार घडला. याचा व्हिडिओ सोशल मीडियात प्रसारित झाल्यानंतर पोलिसांनी त्याची दखल घेतली आहे. संबंधितांना लवकरच अटक केली जाईल, असे औरंगाबादमधील पोलिसांनी म्हटले आहे.

औरंगाबाद शहराचे नाव संभाजीनगर करण्याची मागणी शिवसेनेने खूप वर्षांपूर्वी केली आहे. शिवसैनिकांकडून या शहराचा उल्लेख संभाजीनगर असाच केला जातो. औरंगाबाद शहरातील रेल्वे स्थानकावर मोठ्या फलकावर शहराचे नाव लिहिण्यात आले आहे. याच फलकावर काही जणांनी पिवळा रंग टाकून औरंगाबाद नाव पुसण्याचा प्रयत्न केला. त्याचबरोबर तिथे मोठ्या अक्षरात संभाजीनगर असे लिहिण्यात आले.

याचा व्हिडिओ औरंगाबादमध्ये सोशल मीडियात मोठ्या प्रमाणात फिरला. यानंतर पोलिसांनी त्याची दखल घेतली आणि हे कृत्य करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आश्वासन दिले. संबंधितांना लवकरच अटक केली जाईल, असे पोलिसांनी म्हटले आहे. एएनआयने या संदर्भातील ट्विट केले आहे.

web Title: few men removing the name Aurangabad and writing Sambhaji Nagar Police say They will be arrested soon

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com