सावधान! तुमच्या नोटा खऱ्या आहेत ना यांची खात्री करा

सावधान! तुमच्या नोटा खऱ्या आहेत ना यांची खात्री करा

या निवडणुकीत बनावट नोटांचा सुळसुळाट तर होणार नाहीए ना? असा प्रश्न निर्माण झालाय. कारण कोल्हापुरात चक्क बनावट नोटा छापणारा कारखाना सापडलाय. इचलकरंजीच्या दातारा मळा परिसरात हा कारखाना होता. या कारखान्यातून जवळपास दहा लाखांच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्यात. 

दोन हजार, पाचशे आणि दोनशे रुपयांच्या बनावट नोटा या कारखान्यात सापडल्यात. मतदानाचा दिवस जवळ आलाय आणि अशात हा धक्कादायक प्रकार समोर आलाय. केवळ बनावट नोटाच नाही, तर त्या छापण्यासाठीची यंत्रसामग्रीही पोलिसांनी ताब्यात घेतलीए. 

या कारखान्यात पोलिसांच्या हाती दहा लाखांच्या बनावट नोटा सापडल्यात. पण या बोगस नोटा छापणाऱ्यांनी आधीच काही नोटा बाजारात खपवल्याची माहिती मिळतेय. त्यामुळे बाजारात पसरेल्या या बनावट नोटांनी चिंता वाढवलीए.

निवडणुकीत मतदारांना आमिष दाखवण्यासाठी या नोटांचा वापर तर होणार नव्हता ना? या नोटा त्यांनी नेमक्या कुठे खपवल्या? या कारखान्याचं कुठलं राजकीय कनेक्शन तर नाही ना, याचा आता पोलिस तपास करतायत.

Web Title: factory of fake currency seized by maharashtra police

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com