'संजय राऊत यांच्या आकड्याचा आम्ही शोध घेत आहोत' : शरद पवार

'संजय राऊत यांच्या आकड्याचा आम्ही शोध घेत आहोत' : शरद पवार

मुंबई : संजय राऊत यांनी जो 175 आमदारांचा आकडा दिलायं त्याचा आम्ही शोध घेत आहोत. संजय राऊत नेहमीच भेटत असतात. थोड्याच दिवसांत राज्यसभेचं अधिवेशन सुरू होत आहे. तिथे काही विषय मांडायचे आहेत. त्याबाबत आम्ही दोघे चर्चा करत असतो, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सांगितले. 

राज्यातील राजकीय परिस्थिती अद्याप निश्चित झाली नसताना शरद पवार यांनी आज (बुधवार) पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत शरद पवार काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष होते. त्यांनी सामाजिक व शेतकऱ्यांच्या प्रश्नावर भाष्य करत विरोधी पक्षात बसणार हे स्पष्ट केले आहे.

शरद पवार म्हणाले, की युतीत सडले असे म्हणूनही हे दोन्ही पक्ष एकत्र निवडणूक लढले. राज्याच्या स्थितीबाबत बोलण्यासारखं काही नाही. राजकीय अस्थिरता लवकर संपवा. आम्ही वाट पाहतोय, की भाजप शिवसेनेनं लवकरात लवकर सरकार बनवावं. आम्हाला विरोधी पक्ष म्हणून काम करण्याची संधी जनतेनं दिली आहे. आम्ही सक्षम विरोधी पक्ष म्हणून काम करू. भाजप-शिवसेनेची 25 वर्षाची युती आहे. आजची नाही. जनतेनं भाजप शिवसेनेला कौल दिला आहे. त्यांनी सरकार बनवावे. 

अहमद पटेल हे नितीन गडकरी यांच्याकडे कोणत्या तरी मोठ्या रस्त्यांचे काम घेवून गेले असतील. दुसरा कोणताही हेतू नसेल, असेही पवार यांनी सांगितले.
 

Web Title: NCP chief Sharad Pawar talked about Sanjay Raut claims

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com