'शिवडे' फेम प्रियकराला महापालिकेकडून अभय?

'शिवडे' फेम प्रियकराला महापालिकेकडून अभय?

पिंपरी : प्रेयसीची माफी मागण्यासाठी पिंपरी-चिंचवड शहरात तब्बल तीनशे जाहिरात फलक लावलेला प्रियकर शहरातील काही बड्या राजकीय नेत्यांचा नातेवाईक निघाला. राजकीय दबावामुळे त्याने पहिल्यांदाच असे कृत्य केल्याचे सांगत महापालिकेने कारवाई करण्यास चक्‍क नकार दिल्याची जोरदार चर्चा सध्या शहरात सुरू आहे. 

पिंपळे सौदागर भागात प्रियकराने तीनशे फलक लावले. त्याची चर्चा सुरू झाल्यावर वाकड पोलिसांनी चौकशी सुरू केली. घोरपडीत राहणाऱ्या नीलेश खेडकर यांनी हे बेकायदा फलक लावल्याचे वाकड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक सतीश माने यांनी सांगितले. याबाबत आपण महापालिकेला पुढील कार्यवाहीसाठी कळविणार असल्याचे प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले. बेकायदा फलक लावणारे खेडकर हे शहरातील काही बड्या राजकीय नेत्याचे नातेवाईक असल्याचे समजते. या नेत्यांनी महापालिकेवर दबाव आणून कारवाई थांबविल्याची चर्चा सध्या शहरात सुरू आहे. सोशल मीडियावरही हे प्रकरण चांगलेच गाजत आहे. 

"संबंधित तरुणाने लावलेले सर्व फलक महापालिकेने काढून घेतले आहेत. त्याने पहिल्यांदाच असे कृत्य केल्याने त्याच्या विरोधात फौजदारी कारवाई केलेली नाही. हा राजकीय फलक नसल्याने राजकीय दबावाचा संबंधच नाही.'' 
- श्रावण हर्डीकर, आयुक्‍त 

Web Title: corporation's support Shivade Fame lover,NMC to refuse to take action?

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com