पुण्यातून पळालेले कुटुंब लातुरात सापडले

पुण्यातून पळालेले कुटुंब लातुरात सापडले

लातूर : पुण्यात एका कोरोनाग्रस्त कुटुंबीयाच्या घरी कामाला असलेल्या काही व्यक्ती तेथून पळून आल्याची माहिती मिळाल्यानंतर त्यांचा शोध घेण्यासाठी गुरुवारी (ता. १२) पोलिस यंत्रणा कामाला लागली. तब्बल पाच तासांच्या शोधानंतर गुंफावाडी (ता. लातूर) येथे संबंधित व्यक्ती सापडल्या.

मालक कोरोनाग्रस्त झाल्याची माहिती मिळताच हे कुटुंब तेथून पळाले. पुण्याच्या उपजिल्हाधिकार्‍यांनी यासंदर्भात कळंबच्या उपजिल्हाधिकारी अहिल्या गाठाळ यांना माहिती दिली. दुबईहून पुण्यात एक कुटुंब आले असून ते कोरोनाग्रस्त आहे. त्यांच्याकडे कळंब येथील कुटुंब कामाला होते. दिवसभर शोध घेऊनही कुटुंब सापडले नाही; पण ते लातूरला गेल्याची माहिती कळली.

येथील विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेत रात्री साडेदहाच्या सुमारास सहा जणांना संशयित रुग्ण म्हणून दाखल करण्यात आले आहे. त्यांचे स्वॅबचे नमुने पुण्याच्या प्रयोगशाळेला पाठवण्यात येणार आहेत. 

लातूरमध्ये शोध घेताना कुटुंब मुरूडला गेल्याचे सांगळेंना समजले. त्यांच्या पथकाने मुरूडचे पोलिस निरीक्षक गोमारे यांच्या मदतीने मुरूड परिसरात मोहीम सुरू केली. कुटुंब गुंफावाडीत गेल्याचे कळताच येथे पथक गेले. तेथील नातेवाइकाच्या घरी हे कुटुंब सापडले. 

सांगळेंसह त्यांच्या पथकाने मास्क घालूनच कुटुंबाची चौकशी केली. कोरोनाग्रस्त कुटुंबात हे कुटुंब राहिल्याने त्याच्याकडे संशयित म्हणून पाहिले जात आहे.

हलगर्जीपणाचा कळस

या प्रकरणात पुण्याच्या आरोग्य यंत्रणेने हलगर्जीपणा केल्याचे दिसत आहे. या व्यक्ती आतापर्यंत कोणाच्या संपर्कात आल्या, त्या खासगी बसमधून किंवा अन्य कोणत्या वाहनातून आल्या, कोठे कोठे फिरल्या आदींची माहिती कोणत्याही यंत्रणेला नाही.

Web Title Corona Virus suspected Patient family in latur  

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com