भारताकडून चांद्रयान 2 मोहीम हाती; चंद्राच्या आभ्यासासाठी भारताचं आणखी एक पाऊल

भारताकडून चांद्रयान 2 मोहीम हाती; चंद्राच्या आभ्यासासाठी भारताचं आणखी एक पाऊल

चंद्राबद्दल तुम्हा आम्हाला नेहमीच आकर्षण वाटत आलंय. भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्रोनं याच चंद्राच्या अभ्यासासाठी चांद्रयान दोन ही मोहीम हाती घेतलीय. या मोहिमेचा एक भाग म्हणून तामिळनाडूच्या महेंद्रगिरीत यशस्वी चाचणी घेण्यात आली. आता 19 जूनला स्पेसक्राप्ट बंगळुरूच्या दिशेनं रवाना होईल. त्यानंतर 20 किंवा 21 जूनला हे स्पेसक्राप्ट श्रीहरीकोटातल्या लॉन्चपॅडवर दाखल होईल. भारतासाठी ही अतिशय महत्वाची मोहीम असल्यानं इस्रोची संपूर्ण टीम जीव ओतून काम करतीय.

चांद्रयान-2 ची वैशिष्ट्ये

- चांद्रयान-2 चं वजन 3290 किलो असेल.-
- चंद्राच्या कक्षेत प्रवेश केल्यानंतर ऑर्बिटर लॅण्डरपासून वेगळा होईल.-
- यानंतर लॅण्डर चंद्राच्या पृष्ठभागावर उतरेल आणि मग रोवर त्यापासून वेगळा होईल.-
- ऑर्बिटरमध्ये अनेक संवेदनशील उपकरणं, कॅमेरा आणि सेंसर असतील.-
- तर रोवरमध्येही अत्याधुनिक उपकरणं असतील.-
- हे दोन्ही चंद्राच्या पृष्ठभागावर मिळणारे मिनरल्स आणि इतर पदार्थांची माहिती पाठवतील.-
- त्या माहितीच्या आधारावर इस्रो त्यावर अभ्यास करेल.-

भारतानं यापूर्वी 2009 साली चांद्रयान-1 मोहीम राबवली होती. 10 वर्षानंतर पुन्हा एकदा भारतानं महत्वाकांक्षी पाऊल उचललंय. या मोहिमेनं भारताच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला जाणार अशी आशा करायला हरकत नाही. 

WebTitle : marathi news chandrayan 2 to reach moon in September 


 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com