दोन तासांच्या ड्रामानंतर माजी केंद्रीय अर्थमंत्री पी चिदंबरम यांना अटक 

दोन तासांच्या ड्रामानंतर माजी केंद्रीय अर्थमंत्री पी चिदंबरम यांना अटक 

तब्बल दोन तासांच्या नाट्यानंतर माजी केंद्रीय अर्थमंत्री पी चिदंबरम यांना सीबीआयने ताब्यात घेतलंय. दिल्ली हायकोर्टाने त्यांचा अटकपुर्व जामीन अर्ज फेटाळल्यानंतर सीबीआय चिदंबरम यांच्या शोधात होती. अखेर बुधवारी संध्याकाळी चिदंबरम यांनी काँग्रेस मुख्यालयात पत्रकार परिषद घेत, आपण निर्दोष असल्याचा दावा केला. त्यानंतर त्यांनी थेट आपलं निवासस्थान गाठलं. त्यांच्या पाठोपाठ सीबीआय, ईडी आणि दिल्ली पोलीसांचं पथक त्यांच्या निवासस्थानी दाखल झालं आणि तासभर जुजबी चौकशी केल्यानंतर त्यांना ताब्यात घेण्यात आलं.

दरम्यान अटक होण्या आधी चिदंबरम यांनी पत्रकार परिषद घेतली ते म्हणाले, मला न्यायालयाकडून अंतरिम जामीन 31 मेला मिळाला होता. 7 महिन्यानंतर माझा अंतरिम जामीन नाकारण्यात आला. माझ्या वकिलांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. काल रात्री मी माझ्या वकिलांसोबत चर्चा केली. त्याबाबतची कागदपत्रे जमा केली.

तसेच ते पुढे म्हणाले, मी कायद्याचा सन्मान करतो. तपास संस्थांनीही कायद्याचा आदर केला पाहिजे. त्यानुसार वागले पाहिजे, अशी मी अपेक्षा करतो. शुक्रवारपर्यंत वाट पाहू. नक्कीच काहीतरी चांगले घडले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com