सावरकर फुले यांच्यासह भाजपच्या संकल्पपत्रात आणखी काय?

सावरकर फुले यांच्यासह भाजपच्या संकल्पपत्रात आणखी काय?

मुंबई - विधानसभा निवडणुकीसाठी भाजप -शिवसेनेची युती असली तरी दोन्ही पक्षांनी आपला वेगवेगळा जाहीरनामा प्रसिद्ध केलाय. 
शिवसेनेचा वचननामा काल प्रसिद्ध झाल्यानंतर आज भाजपचा जाहीरनामा प्रसिद्ध झालाय. 
भाजपच्या जाहीरनाम्याला संकल्पपत्र असं नाव देण्यात आलंय. भाजपचे राष्ट्रीय कार्यकारणी अध्यक्ष जे. पी. नड्डा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, 
चंद्रकांत पाटील, विनोद तावडे, महाराष्ट्र प्रभारी सरोज पांडे यांच्या उपस्थितीत भाजपचा जाहीरनामा सादर झाला.

यंदाच्या भाजपच्या संकल्पपत्रात  वेगवेगळ्या घोषणा करण्यात आल्या आहेत.  विशेष म्हणजे महात्मा जोतिबा फुले आणि 
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्यासह विनायक सावरकरांना भारतरत्न देण्याचा प्रयत्न करु असं आश्वासन भाजपनं दिलंय. 
अनेक वर्षांपासून महान व्यक्तींना भारतरत्न देण्याची मागणी होत आहे. हीच मागणी भाजपनं आपल्या संकल्पपत्रात समाविष्ट
 केली आहे. यासोबत अपेक्षेप्रमाणे भाजपने आपल्या संकल्पपत्रातून घोषणांचा पाऊस पाडलाय. यंदाही सबका साथ सबका 
विकास हेच भाजपचं ब्रीद असणार आहे.. येत्या ५ वर्षात १ कोटी रोजगार, २०२२ पर्यंत प्रत्येक भारतीयाला घर, 
संपूर्ण महाराष्ट्रात इंटरनेटचं जाळं यासह अनेक घोषणांचा पाऊस या संकल्पपत्रातून पाडण्यात आलाय. याशिवाय
 महाराष्ट्र येत्या ५ वर्षात दुष्काळमुक्त करु असं आश्वासनही भाजपनं दिलंय. ही आश्वासनं भाजप पूर्ण करणार का हे पाहणे आता औत्सुक्याचं ठरेल.


भाजपने संकल्पपत्रात नेमकी कोणती आश्वासनं दिली आहेत, वाचा-

1. सोलारद्वारे शेतीला 12 तास वीज पुरवणार

2. मराठवाड्यात वॉटर ग्रीन प्रकल्पाला चालना, पिण्याच्या पाण्यासाठी आम्ही योजना राबवणार

3. राज्यातील 1 कोटी बेरोजगारांना रोजगार देणार

4. महात्मा फुले, सावित्रीबाई फुले आणि वीर सावरकरांना भारतरत्न देण्यासाठी प्रयत्न करणार

5. 1 कोटी महिलांना बचत गटाशी जोडून रोजगाराच्या संधी देणार

6. प्रत्येक बेघराला 2022 पर्यंत घर आणि प्रत्येकाला पिण्याचं पाणी देणार

7. पायाभूत सुविधांमध्ये 5 लाख कोटींची गुंतवणूक करणार

8. राज्यातील रस्त्यांच्या उभारणी, देखभालीसाठी स्वतंत्र्य उभारणार

9. पंतप्रधान ग्राम सडक योजनेद्वारे प्रत्येक वाडी-वस्ती रस्त्याद्वारे जोडणार

10. भारत नेट आणि महानेटद्वारे संपूर्ण महाराष्ट्र इंटरनेटद्वारे जोडणार

11. प्रधानमंत्री आयुषमान योजनेद्वारे प्रत्येकाच्या मोफत उपचाराची सोय करणार

12. शिक्षणात राष्ट्रीय आणि संविधानिक गोष्टीचा समावेश करणार

13. सर्व कामगारांचा नोंदी कऱणार, त्यांना नोकरीची सुरक्षितता पुरवणार

14. राज्यातील शहीद झालेले जवानांचे, पोलिसांच्या कुटुंबियांच्या पुनर्वसनासाठी योजना राबवणार

15. राज्यातील प्रकल्पग्रस्तांचं लवकरात लवकर पुनर्वसन करणार

16. येत्या ५ वर्षात संपूर्ण महाराष्ट्र दुष्काळमुक्त करणार


तर, शिवसेनेने आपल्या वचननाम्यामध्ये काय वचनं दिली आहेत, वाचा -
 

1. आर्थिक दुर्बल कुटुंबातील मुलींचे महाविद्यालयीन शिक्षण विनामूल्य करणार

2. प्रत्येक जिल्ह्यात महिला बचत गट भवन उभारणार

3. राज्यातील १५ लाख पदवीधर तरुणांना युवा सरकार फेलो मार्फत शिष्यवृत्तीची संधी देणार

4. तालुका स्तरावर गाव ते शाळा, महाविद्यालयामधील सर्व विद्यार्थ्यांसाठी 'विद्यार्थी एक्स्प्रेस' अशा २५०० विशेष बसची सेवा सुरू करणार

5. अल्पभूधारक आणि आर्थिक दुर्बल घटकांतील शेतकऱ्यांच्या खात्यात प्रतिवर्षी १० हजार रुपये थेट जमा करणार

6. कर्जबाजारी शेतकऱ्यांचा ७/१२ कोरा करणार

7. शहरांच्या विकासासाठी 'मुख्यमंत्री शहर सडक योजना' अंमलात आणणार. सर्व नगरपरिषदा, नगरपालिका आणि महागनरपालिका क्षेत्रातील रस्त्यांसाठी अर्थसंकल्पात तरतूद करणार

8. ३०० युनिटपर्यंत वापर करणाऱ्या ग्राहकांसाठी घरगुती वीजदर ३० टक्क्यांनी कमी करणार

9. स्थानिकांना नोकऱ्यांमध्ये ८० टक्के आरक्षणासाठी कायद्या बनवून भूमिपुत्रांना न्याय देणार

10. मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळवण्यासाठी मंत्री दर्जाचे विशेष खाते निर्माण करणार

11.  प्राथमिक आरोग्य चाचण्या ज्या सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर आहेत त्या १ रुपयात करणार

12.  राज्यात एक हजार ठिकाणी स्वस्त जेवणाची केंद्र स्थापन करणार१० रुपयांमध्ये सकस आहार देणार.

Web Title : BJP MainFesto For Vidhansabha Election 2019

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com