'गटारे आणि शौचालये साफ करण्यासाठी मी खासदार झाली नाही' - साध्वी

'गटारे आणि शौचालये साफ करण्यासाठी मी खासदार झाली नाही' - साध्वी

भोपाळ : गटारे आणि शौचालये साफ करण्यासाठी मी खासदार झाली नसल्याचे वादग्रस्त वक्तव्य भोपाळच्या भाजपच्या खासदार साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांनी केले आहे.

साध्वी यांनी केलेल्या वक्तव्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, नेटकऱ्यांनीही साध्वींवर टीका केली आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या स्वच्छता अभियानाची साध्वींनी एक प्रकारे खिल्ली उडवल्याचीही राजकीय वर्तुळात चर्चा आहे. साध्वी नेहमीच वादग्रस्त विधानांसाठी नेहमीच चर्चेत असतात. आता पुन्हा एकदा त्यांनी असाच वाद ओढावून घेणारं विधान केले आहे. यापूर्वीही त्यांनी हुतात्मा हेमंत करकरे यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले होते. तसेच नथुराम गोडसे हा देशभक्त होता, आहे आणि राहील, असेही म्हटले होते.   

मध्य प्रदेशातील सिहोर येथे एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी त्या बोलत होत्या. साध्वी म्हणाल्या, आम्ही गटारे आणि शौचालये साफ करण्यासाठी खासदार झालेलो नाही. ज्यासाठी आम्हाला खासदार म्हणून जनतेने निवडून दिले आहे, ते काम आम्ही प्रामाणिकपणे करू.

Web Title: Wasnt elected to clean toilets and drains says BJP MP Sadhvi Pragya

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com