Loksabha 2019 : BJP चे संकल्पपत्र जाहीर,  राष्ट्रीय सुरक्षा, शेतकऱ्यांचे कोटकल्याण, युवक व महिला सशक्तीकरण, रोजगार या मुद्द्यांवर जोर

Loksabha 2019 : BJP चे संकल्पपत्र जाहीर, राष्ट्रीय सुरक्षा, शेतकऱ्यांचे कोटकल्याण, युवक व महिला सशक्तीकरण, रोजगार या मुद्द्यांवर जोर

नवी दिल्ली : पुन्हा सत्तेत येण्यासाठी आतुर झालेल्या भारतीय जनता पक्षाच्या प्रस्तावित व प्रतीक्षित संकल्पपत्रात राष्ट्रीय सुरक्षा, शेतकऱ्यांचे कोटकल्याण, युवक व महिला सशक्तीकरण, रोजगार या मुद्द्यांवर जोर देण्यात आला असून, शेतकऱ्यांना 1 लाखांपर्यंतच्या कर्जावर पाच वर्षांपर्यंत व्याज नसल्याची महत्त्वपूर्ण घोषणा करण्यात आली. तसेच 60 वर्षांवरील लघु उद्योजक आणि शेतकऱ्यांना पेन्शन देण्यात येणार आहे.

भाजपने संकल्पपत्र 2019 असा  पक्षाचा जाहीरनामा प्रसिद्ध केला. 'संकल्पित भारत, सशक्त भारत' असा सत्तारूढ पक्षाचा दावा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, अध्यक्ष अमित शहा, गृहमंत्री राजनाथसिंह, अर्थमंत्री अरुण जेटली आदी प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत भाजपने संकल्पपत्र प्रसिद्ध केले. 

राजनाथसिंह म्हणाले : 
- दहशतवादाविरोधात झिरो टॉलरन्स धोरण राबविणार
- शेतकऱ्यांसाठी किसान सन्मान योजना, 1 लाखांपर्यंत कृषी कर्जावर पाच वर्षांपर्यत व्याज नाही
- ग्रामीण भागाच्या विकासासाठी 25 लाख रुपयांचा निधी देणार
-  60 वर्षांवरील शेतकरी आणि छोट्या उद्योजकांना निवृत्तीवेतन देणार
- गरिब कुटुंबांना एलपीजी सिलिंडर देण्यात येणार
- सर्व घरांत विद्युतीकरण करणार
- राष्ट्रीय व्यापार आयोगाची स्थापना करणार  
- 2022 पर्यंत 75 संकल्प पूर्ण करण्याचा आमचा संकल्प आहे
- देशातील जनतेचा विश्वास वाढला आहे
- विकास मोठ्या गतीने होत आहे
- अंतर्गत सुरक्षा मजबूत केली असून, नागरिकांच्या मनामध्ये सुरक्षेची भावना निर्माण केली आहे
- संकल्पपत्रातून नवा भारत निर्माण करण्याचा प्रयत्न
- सोशल मीडियाच्या माध्यमातून नव्या संकल्पना आणल्या
- गेल्या पाच वर्षांतील कामगिरीचा आधार घेतला आहे
- 75 वैद्यकीय महाविद्यालयांची स्थापना करण्यात येईल
- 5 किमी अंतरात बँकिंग सुविधा निर्माण करण्यात येतील

Web Title: Bharatiya Janata Party releases its manifesto SankalpPatra for LokSabha Elections 2019

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com