LokSabha 2019 : बारामतीत रंगणार दोन माहेरवाशिणींचा सामना

LokSabha 2019 : बारामतीत रंगणार दोन माहेरवाशिणींचा सामना

केडगाव (जि. पुणे) : बारामती लोकसभा मतदार संघातून भाजपकडून आमदार राहुल कुल यांच्या पत्नी कांचन कुल यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर आज सकाळी कार्यकर्त्यांनी तालुक्यात फटाके वाजवून उमेदवारीचे स्वागत केले. बारामती लोकसभा मतदार संघात भाजपने प्रथमच पवार कुटुंबीयांपुढे एक तगडे आव्हान उभे केले आहे.

गेले तीन महिने कांचन कुल यांच्या नावाची चर्चा होती. राहुल कुल हे उमेदवारी बाबत आग्रही नसले तरी भाजपने आदेश दिला तर निवडणुकीत उतरू या भूमिकेत ते होते. बारामती लोकसभा मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार खासदार सुप्रिया सुळे व कांचन कुल यांच्यात मुख्य लढत होईल.

कांचन या सक्रिय राजकारणात नसल्या तरी राहुल कुल यांच्या निवडणुक प्रचारात त्या सक्रियपणे उतरल्या आहेत.

सुळे सारख्या बलाढय उमेदवाराचा सामना कांचन यांना करावा लागणार आहे. आदर्श संसदपटू ते राजकारणातील नवीन चेहरा अशी लढत असेल. या दोघींचे माहेर बारामती आहे. कांचन कुल (वय 34) यांचे माहेर हे वडगाव निंबाळकर येथील आहेत. कुमारराजे निंबाळकर यांच्या त्या कन्या आहेत. निंबाळकर हे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचे चुलत भाऊ आहेत.

नात्यागोत्यांमुळे बारामतीतील राजकारण यंदा प्रथमच ढवळून निघणार असे दिसते. कांचन यांचे शिक्षण बी.ए.पर्यंत झालेले आहे. सासरे दिवंगत आमदार सुभाष कुल, सासू माजी आमदार रंजना कुल व पती आमदार राहुल कुल अशी मोठी राजकीय पार्श्वभूमी कांचन कुल यांची आहे. त्यांना माहेरकडून राजकीय वारसा नाही. कांचन या सक्रीय राजकारणात नसल्या तरी राहुल कुल यांच्या निवडणुक प्रचारात त्या सक्रीयपणे उतरल्या आहेत. दौंड तालुक्यातील राहू हे त्यांचे सासरचे गाव आहे. घरी आलेले कार्यकर्ते व नागरिकांची आदबीने विचारपूस आदरतीथ्य करीत असतात.

दौंड तालुक्यातील कुल कुटुंबीय हे पवार घराण्याशी 2014 पर्यंत एकनिष्ठ होते. 2009 च्या विधानसभा निवडणुकीत राहुल कुल यांना राष्ट्रवादीने उमेदवारी दिली मात्र आतून मदत त्यांचे प्रतिस्पर्धी रमेश थोरात यांना केली. परिणामी कुल यांचा पराभव झाला. अशी तक्रार कुल यांच्या कार्यकर्त्यांंची आहे. जो निवडून येईल तो आपला या पवार नितीमुळे कुल कुटुंबीयांनी पवारांशी फारकत घेत 2014 ची विधानसभा राष्ट्रवादीच्या विरोधात जाऊन लढविली. आणि ते विजयी झाले.

Web Title: Kanchan Kul to face Supriya Sule in Baramati

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com