या जेष्ठ शिवसैनिकाचा सेनेतून राष्ट्रवादीत प्रवेश

या जेष्ठ शिवसैनिकाचा सेनेतून राष्ट्रवादीत प्रवेश

बदलापूर : बदलापूरमधील ज्येष्ठ शिवसैनिक, माजी नगरसेवक प्रभाकर पाटील यांनी शिवसेनेला 'जय महाराष्ट्र' करीत राष्ट्रवादी कॉंग्रेस मध्ये प्रवेश केला असल्याची माहिती राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहर अध्यक्ष व गटनेते कॅप्टन आशिष दामले यांनी पत्रकार परिषदेत दिली. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या उपस्थितीमध्ये हा प्रवेश झाला असल्याचे दामले यांनी सांगितले. प्रभाकर पाटील यांच्या या प्रवेशाने राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये इनकमिंग सुरु झाले असल्याचेही त्यांनी सांगितले.

बदलापूर शहरात शिवसेना ज्या वेळी अडचणीत होती, त्या काळात प्रभाकर पाटील यांनी शिवसेना टिकवून वाढवण्याचे काम केले होते. ते तीन वेळा पालिकेवर निवडून गेले होते. निवडणुकीत पक्षांतर्गत गटबाजीमुळे आपला प्रभाव झाला असल्याची भावना प्रभाकर पाटील यांची झाली होती. गेल्या काही काळापासून ते पक्षीय राजकारणापासून अलिप्त होते.

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या उपस्थितीत प्रभाकर पाटील यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला. जयंत पाटील यांनी प्रभाकर पाटील यांचे पक्षात स्वागत केले. शहराध्यक्ष व गटनेते कॅप्टन आशिष दामले हे यावेळी उपस्थित होते.

बदलापूर शहरात शिवसेनेमध्ये नाराजी आहे. त्याचा लाभ आम्ही नक्की घेणार आहोत. प्रभाकर पाटील हे त्यांच्या कार्यकर्त्यांसमवेत राष्ट्रवादी कॉंग्रेस मध्ये आले असल्याने पक्षाची शहरातील ताकत आणखी वाढली आहे. आता राष्ट्रवादी कॉंग्रेस मध्ये इनकमिंग सुरु झाले आहे. येत्या दोन महिन्यात अनेक जण राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात प्रवेश करतील, असा विश्वास दामले यांनी यावेळी व्यक्त केला.

बदलापूर शहरात प्रत्येक प्रभागांनुसार संघटना बांधणीचे काम सुरु आहे. वरिष्ठांचा आदेश येईल त्याप्रमाणे पालिका निवडणूक लढविण्यात येईल सध्या सर्व प्रभागात उमेदवार उभे करण्याच्या दृष्टीने कार्यक्रम हाती घेतला आहे. वरिष्ठ पातळीवरून महाविकास आघाडी झाली तर त्या प्रमाणे नाही तर स्वबळावर पालिका निवडणूक लढविणार असल्याचे कॅप्टन आशिष दामले यांनी यावेळी सांगितले.

Web Title - balasaheb thorat will be guardian minister kolhapur

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com