मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गावरून मेट्रो रेल्वे धावणे सध्या शक्य नाही

मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गावरून मेट्रो रेल्वे धावणे सध्या शक्य नाही

औरंगाबाद : 'जागा उपलब्ध नसल्याने मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गावरून मेट्रो रेल्वे धावणे सध्या शक्य नाही,' असे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे सहव्यवस्थापकीय संचालक अनिलकुमार गायकवाड यांनी सांगितले. भविष्यात मेट्रोसाठी नियोजन करायचे ठरल्यास नव्याने भूसंपादन करावे लागेल. या महामार्गावर 40 वर्षे टोलवसुली सुरू राहील, असेही त्यांनी सांगितले. 

महामार्गाचा मध्य दुभाजक 15 मीटरचा असल्याने मेट्रो जाणार कुठून? हा प्रश्न निर्माण होतो. कारण रेल्वेसाठी किमान 17 मीटरचा दुभाजक लागतो. त्यामुळे सध्या तरी ही जागा वाढविणे शक्य नाही. सध्या भूसंपादन केलेल्या 120 मीटरपैकी केवळ 49 मीटर जागा वापरली आहे. या रस्त्याचे रेखांकन 150 किलोमीटर प्रतितास वेगाच्या वाहनासाठी तयार करण्यात आले आहे. 2021 मध्ये या महामार्गाचे काम पूर्ण होऊन वाहनांसाठी तो खुला करण्याकरिता 'एमएसआरडीसी' प्रयत्नशील आहे. 

Web Title: Metro will not run on mumbai nagpur samruddhi highway

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com