#Loksabha2019 : शरद पवारांना भाजपमध्ये घेऊ नका : उद्धव ठाकरे

#Loksabha2019 : शरद पवारांना भाजपमध्ये घेऊ नका : उद्धव ठाकरे

अमरावती : ''सध्या कोणावर टीका करायची म्हणजे पंचायत होते. आता कोणत्यातरी पक्षात असला आणि नंतर शिवसेना किंवा भाजपमध्ये असायचा. त्यामुळे आता माझी एकच विनंती आहे, की आता शरद पवारांना भाजपमध्ये घेऊ नका'', असे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज (शुक्रवार) म्हटलंय.

अमरावती येथे शिवसेना-भाजप युतीचा महामेळावा आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी उद्धव ठाकरे बोलत होते. काँग्रेसचे विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांचे पुत्र डॉ. सुजय विखे-पाटील यांनी काँग्रेसमधून बाहेर पडत भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांच्या या प्रवेशानंतर उद्धव ठाकरे यांनी याबाबत वक्तव्य केले. ते म्हणाले, माझी एक विनंती आहे, की आता शरद पवारांना भाजपमध्ये घेऊ नका. नाहीतर निवडणुकीत गंमत येत नाही. थोडे तरी लोकं समोर ठेवा. सगळेच लोकं आपल्या पक्षात आले तर बोलायचं कोणावर?  

भावासारखी व्यक्ती पंतप्रधानपदी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अजूनही मी नरेंद्रभाई म्हणतो. आपला भाऊ वाटावा, अशी व्यक्ती देशाच्या पंतप्रधानपदी आहे. याचा मला अभिमान आहे, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.

Web Title: But dont give entry to Sharad Pawar in BJP says Uddhav Thackeray

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com