अजित पवारांना अर्थमंत्रिपद तर वळसे पाटील आणि भरणेंना ही खाती...

अजित पवारांना अर्थमंत्रिपद तर वळसे पाटील आणि भरणेंना ही खाती...

पुणे : महाविकास आघाडी सरकारचा मंत्रिमंडळ विस्तारानंतर आज (रविवार) सहा दिवसांनी मंत्र्यांना खातेवाटप झाले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांना अर्थमंत्रीपद देण्यात आले आहे. तर, पुणे जिल्ह्यातील अन्य दोन मंत्री दिलीप वळसे पाटील यांना कामगार, राज्य उत्पादन शुल्क आणि राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे यांच्याकडे सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून), मृद व जलसंधारण, वने, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय, सामान्य प्रशासन ही खाती असणार आहेत.

शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचा समावेश असला तरी, मंत्रिमंडळात पुणे जिल्ह्यात राष्ट्रवादीचा वरचष्मा आहे. पक्षाच्या वाट्याला आलेल्या तेरापैकी तीन मंत्रिपदे जिल्ह्याला मिळाली आहेत. पवार हेच पुण्याचे पालकमंत्री असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, त्यांच्याकडे कोणत्या खात्याचा कारभार राहील, याची उत्सुकता होती. अखेर त्यांच्याकडे अर्थमंत्रीपदाचा कार्यभार आला आहे.

मंत्रिमंडळ विस्तारात राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते दिलीप वळसे-पाटील, अजित पवार यांना कॅबिनेट, तर दत्तात्रेय भरणे यांनी राज्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती. आघाडी सरकारमध्ये 2009 ते 2014 या काळात वळसे-पाटील विधानसभेचे अध्यक्ष, तर पवार हे उपमुख्यमंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री होते. माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांना सलग दुसऱ्यांदा पराभूत करणाऱ्या भरणे यांना राज्यमंत्रिपदाची संधी मिळाली आहे.

मंत्रिमंडळात पुणे 
एकूण मंत्री : 3 (सर्व राष्ट्रवादी) 

1. अजित पवार, उपमुख्यमंत्री (बारामती) : वित्त, नियोजन
2. दिलीप वळसे-पाटील, कॅबिनेट मंत्री (आंबेगाव) :  कामगार, राज्य उत्पादन शुल्क
3. दत्तात्रेय भरणे, राज्यमंत्री (इंदापूर) :  सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून), मृद व जलसंधारण, वने, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय, सामान्य प्रशासन

2014च्या भाजप-शिवसेना मंत्रिमंडळातील मंत्री 
1. गिरीश बापट : कॅबिनेटमंत्री 
2. विजय शिवतरे : राज्यमंत्री 
3. दिलीप कांबळे : राज्यमंत्री 
4. बाळा भेगडे : राज्यमंत्री (गिरीश बापट आणि दिलीप कांबळे यांच्या राजीनाम्यानंतर) 

पालकमंत्री 
- अजित पवार : 2004 ते 2014 
- गिरीश बापट : 2014 ते मे 2019 
- चंद्रकांत पाटील : 2019 मध्ये शेवटच्या टप्प्यात 

Web Title: Ajit Pawar Dilip Walse Patil and Dattatraya Bharne gets portfolio in Maharashtra government

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com