गुजरात चक्रीवादळाचे संकट आता पश्‍चिमेकडे वळले

गुजरात चक्रीवादळाचे संकट आता पश्‍चिमेकडे वळले

अहमदाबाद : 'वायू' या चक्रीवादळाचे गुजरातवरील संकट पूर्णपणे टळले असून, हे वादळ आता पश्‍चिमेकडे वळले असल्याची माहिती गुजरातचे मुख्यमंत्री विजय रूपानी यांनी आज दिली. मुख्यमंत्र्यांनी आज गांधीनगरमध्ये वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेतली, या बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांनी सुरक्षितस्थळी हलविण्यात आलेल्या तीन लाख लोकांना त्यांच्या घरी परतण्याची परवानगी द्यावी, अशा सूचनाही अधिकाऱ्यांना केल्या आहेत.

गुजरात आता पूर्णपणे सुरक्षित असून वायू वादळाचा कोणताही धोका राहिलेला नाही. हे वादळ अरबी समुद्रामध्ये पश्‍चिमेकडे सरकले आहे. राज्य सरकार सुरक्षितस्थळी हलविण्यात आलेल्या तीन लाख लोकांना जवळपास 5.5 कोटी रुपयांचे भत्ते देणार असून, हा निधी त्यांच्या रोजच्या खर्चासाठी असेल, असेही राज्य सरकारकडून जाहीर करण्यात आले. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार सध्या हे वादळ अरबी समुद्रामध्ये असून ते हळूहळू किनाऱ्यापासून दूर जाऊ लागले आहे. पोरबंदरपासून ते दीडशे किलोमीटर अंतरावर आहे. 
 
पुढे काय? 
- राज्यातील शाळा, महाविद्यालये सुरू होणार 
- राज्य सरकारचे वरिष्ठ अधिकारीही परतणार 
- किनारी भागातील वाहतूक पूर्वववत 
- 'एनडीआरएफ' पुढील 48 तास गुजरातेतच 
- किनारी भागांत पाऊस अन्‌ ढगाळ वातावरण

Web Title: The stormy crisis in Gujarat was over

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com