राधाकृष्ण विखे पाटील यांना भाजप सरकारमध्ये कॅबिनेटमंत्रीपद निश्चित, कोणते मिळणार खाते?

 राधाकृष्ण विखे पाटील यांना भाजप सरकारमध्ये कॅबिनेटमंत्रीपद निश्चित, कोणते मिळणार खाते?

नगर : राज्यातील ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील यांना भाजप सरकारमध्ये कॅबिनेटमंत्रीपद मिळणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. चंद्रकांत पाटील यांच्याकडील महसूल किंवा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडील गृहखाते विखे पाटील यांच्याकडे देण्याबाबतचा प्रस्ताव पक्षाच्या विचाराधीन आहे. त्यातही महसूल किंवा गृह खाते देण्यात अडचण निर्माण झाल्यास विखे पाटील यांच्याकडे कृषी किंवा नगरविकास खात्याची जबाबदारी सोपविली जाईल, असे सूत्रांनी सांगितले. 

कॉंग्रेस पक्षाचे वजनदार नेते विखे पाटील भाजपच्या गोटात दाखल होणार असल्याने त्यांचा आगामी विधानसभा निवडणुकीत पक्षाला मोठा फायदा होईल, अशी पक्षाच्या नेत्यांची देखील धारणा आहे. त्यातच काल (ता. 6) नगरमध्ये बोलताना विखे पाटील यांनी नगर जिल्ह्यातील बाराही विधानसभा मतदारसंघात भाजप-शिवसेना युतीचे सदस्यच निवडून येतील, असे भाकित केले आहे. ती जबाबदारी देखील त्यांनी घेतली आहे. त्यामुळे विखे पाटील यांच्या भाजप प्रवेशाचा मुहूर्त ठरविण्याची धावपळ सुरु आहे. लवकरच विखे पाटील यांचा पक्षात प्रवेश होईल, असे सांगितले जात आहे. 

भाजपला विखे पाटील यांच्यासारखा वजनदार मराठा नेता हाती लागल्याने विधानसभा निवडणुकीत नगर जिल्ह्याबरोबरच पुणे जिल्हा, तसेच मराठवाडा व विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये आपले बस्तान अधिक मजबूत करायची आयती संधी मिळाली असल्याचे मानले जाते. पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील राष्ट्रवादीची ताकद मोडून काढण्यासाठी विखे पाटील यांना जाणीवपूर्वक कॅबिनेटमंत्रीपद देण्याचा प्रस्ताव आहे. 

Web Title: Radhakrishna Vikhe Patil will be a cabinate minister
 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com