जग तिसऱ्या महायुद्धाच्या उंबरठ्यावर? भारताला बसणार सर्वाधिक झळ?

जग तिसऱ्या महायुद्धाच्या उंबरठ्यावर? भारताला बसणार सर्वाधिक झळ?

अमेरिकेच्या हल्ल्यात इराणच्या सर्वोच्च लष्करी अधिकाऱ्याचा खातमा झाल्यानंतर जगावर युद्धाचे ढग दाटून आलेत. वातावरण आखातात तापलं असलं तरी त्याच्या झळा मात्र भारताला बसणारेत.

अमेरिकेनं केलेल्या एअर स्ट्राईकमध्ये इराणचे सर्वोच्च लष्करी अधिकारी कासिम सुलेमानी यांचा मृत्यू झाला आणि अवघं जग तिसऱ्या महायुद्धाच्या वणव्याकडे वाटचाल करतंय की काय, अशी चर्चा सुरू झालीय. त्याला कारणही तसंच आहे. इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला खामेनी यांनी सुलेमानी यांच्या हत्येचा बदला घेणार असं जाहीर केलंय. तर अमेरिका आपले 3 हजार सैनिक आखातात पाठवतेय. त्यामुळे लवकरच आखातात तिसऱ्या महायुद्धाचा भडका उडू शकतो..
हा भडका अवघ्या जगाला चटके देणारा असेल, असं गेल्या काही दिवसांतल्या घडामोडी सांगतायत.
युद्धजन्य स्थितीचा सर्वाधिक फटका भारतालाच बसणाराय. हा फटका इतका मोठा असेल की सामान्य भारतीयांचं बजेट पार कोलमडून जाईल.
कारण अमेरिकेच्या एअर स्ट्राईकबरोबरच खनिज तेलाच्या किमतीत 5 टक्क्यांनी वाढ झालीय. त्यामुळे पेट्रोल 5 ते 6 रुपयांनी महागण्याची शक्यता आहे..डिझेल आणि स्वयंपाकाचा गॅसही महागण्याची शक्यता आहे. इंधनाचे दर वाढले की वाहतुकीचे दर वाढणार आणि त्यामुळे जीवनावश्यक वस्तूही महागतात हे दुष्टचक्र आहे. सोन्याच्या भावाची घोडदौड पाहता लवकरच ते 50 हजार रुपये तोळा होणार हे दिसतंय..रुपयाची किंमतही दिवसेंदिवस घटत चाललीय..आताच डॉलरची किंमत 71.89 रुपये इतकी झालीय. जगभरातले शेअरबाजारही घसरताहेत. त्याचाही परिणाम भारतात दिसतोय.
युद्धखोरी केवळ काही लोकांसाठी फायदेशीर ठरते..बाकीचे केवळ त्याचे चटके सहन करतात. त्यामुळे या युद्धखोरीला आवर घातला पाहिजे नाहीतर येणारा काळ भीषण असेल.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com