भाजप आमदारांना संघाकडून, अनुशासन आणि शिस्तीचे धडे...

भाजप आमदारांना संघाकडून, अनुशासन आणि शिस्तीचे धडे...

हिवाळी अधिवेशनासाठी नागपुरात आलेल्या भाजप आमदारांनी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं मुख्यालय असलेल्या रेशीमबागेत हजेरी लावली. यावेळी विधानसभेत एकमेकांना धक्काबुक्की करणाऱ्या भाजप आमदारांना संघाकडून, अनुशासन आणि शिस्तीचे धडे देण्यात आल्याची माहिती आहे.

भाजपच्या नवनिर्वाचित आमदारांचा अभ्यास वर्ग दरवर्षी रेशीमबाग येथील डॉ. हेडगेवार स्मृती मंदिरात आयोजित करण्यात येतो.  त्यानुसार यंदाही विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाखाली रेशीमबागेत भाजप आमदारांचे बौद्धिक धडे घेण्यात आलेत.

 हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दोन दिवसात जनतेच्या कोणत्याच मुद्यावर चर्चा झाली नाही. तसंच सरकारचा विरोध करणाऱ्या विरोधकांना चर्चा करायची नाही, असा आरोप शिवसेनेकडून होतोय. त्यास्थितीत संघाच्या पदाधिकाऱ्यांसोबत झालेल्या बौद्धिकात याही मुद्द्यांवर चर्चा झाल्याची माहिती आहे.

पाहा अन्य बातम्या व्हिडीओ स्वरुपात
SUBSCRIBE करा आमचं YOU-TUBE Channel
Link - www.youtube.com/user/SaamTV

फेसबूक आणि ट्विटरवरही आम्हाला फॉलो करा
Facebook - www.facebook.com/SaamTV/
Twitter - www.twitter.com/saamTVnews

साम टीव्ही
बातमी जी व्यवस्था बदलेल!

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com