36 जिल्ह्यांच्या गावागावातील घडामोडी एका क्लिकवर..

36 जिल्ह्यांच्या गावागावातील घडामोडी एका क्लिकवर..

राज्यातील गावागावात काय घडतंय? राजकारणात कोणावर कुणी ताशेरे ओढलेत? यासह तुमच्या गावागावातील महत्वाच्या बातम्यांसाठी वाचा 36 जिल्ह्यांच्या घडामोडी

मुंबई- आजपासून पुढचे तीन दिवस पावसाची शक्यता, तब्बल 4 महिने राज्यासह देशभरात धोधो बरसल्यानंतर, मॉन्सून परतीच्या वाटेवर

नाशिक- लासलगाव येथील बाजार समितीत कांद्याच्या दरात जबरदस्त घसरण, एकाच दिवसात क्विंटलमागे अडीचशे रुपयांची घट  दर पडल्याने ऐन दिवाळीत शेतकरी आर्थिक संकटात

पुणे- मुंबई, पुण्यासह देशातील नऊ शहरांत घरांच्या विक्रीत 25 टक्क्यांची घट, ग्राहकांचा थंड प्रतिसाद पाहता नव्या गृहनिर्माण प्रकल्पांमध्ये ४५ टक्क्यांची कपात, घरांच्या विक्रीवरही परिणाम  

मुंबई- आर्थिक निर्बंधांमुळे व्यवहारांवर मर्यादा आलेल्या PMC बँकेच्या संतप्त ग्राहकांचा थेट मुंबई बंदचा निर्णय, आक्रमक खातेदारांची 31 ऑक्टोबरपर्यंत ऑडिट रिपोर्ट देण्याची मागणी

मुंबई- मध्य रेल्वे मार्गावर आज रात्रकालीन ब्लॉक, दिवा ते कल्याण स्थानकांदरम्यान 18 ऑक्टोबर ते 20 ऑक्टोबरला मध्यरात्री ब्लॉक

मुंबई- आज मुंबईत होणाऱ्या महायुतीच्या प्रचारसभेत नरेंद्र मोदी आणि उद्धव ठाकरे एकाच व्यासपीठावर, या पार्श्वभूमीवर मोदी आणि उद्धव ठाकरे काय बोलतात, याकडे सर्वांचं लक्ष

पुणे-  नरेंद्र मोदींकडून पुन्हा एकदा कलम ३७० हटवण्याच्या केंद्राच्या निर्णयाचं समर्थन,  या मुद्द्यावर बोलताना नरेंद्र मोदी काही काळ झाले होते भावनिक

सातारा- पवारांना साताऱ्यात उमेदवार मिळाला नाही, म्हणून त्यांनी साताऱ्यातून माघार घेतल्याची मोदींची टीका, आघाडीतल्या अंतर्गत कलहावरही ठेवलं बोट तर पवारांवर टीकास्त्र

बारामती- फडणवीसांचा राष्ट्रवादी काँग्रेसवर हल्लाबोल, तर मुख्यमंत्र्यांकडून अजित पवारांवरही टीकास्त्र 

नाशिक- कुस्ती खेळतांना कुणाबरोबर कुस्ती खेळायची हे मी ठरवतो. लहान मुलांबरोबर कुस्ती खेळत नाही असा टोला शरद पवारांनी मुख्यमंत्र्यांना लगावलाय....

पालघर- शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या सभेतील स्वागताचा व्हिडीओ व्हायरल, स्टेजवर उद्धव यांच्यासमोर पकडण्यात आलेल्या हाराचा धागा तुटला, या प्रकारानंतर, हे काय विकासाचा पूल बांधणार, हार निश्चित... अशा आशयाचे मेसेज व्हायरल 

धुळे- शिवसेना भाजपची महायुती झालेली असली, तरी अनेक ठिकाणी अनेक ठिकाणी युतीत फूट, धुळ्यातील शिवसेनेच्या उमेदवाराविरोधात अपक्ष उमेदवार उभा असल्याने त्यांच्या प्रचारात भाजपचे नगरसेवक दिसल्याने आश्चर्य

मुंबई- बीपीसीएलच्या कर्मचाऱ्यांनी मांडल्या व्यथा, बीपीसीएलचं खासगीकरण केल्यामुळे हजारो कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, यावर त्यांचे सोडवण्याचं राज यांचं आश्वासन दिलं

चिंचवड- राष्ट्रवादी खासदार डॉ.अमोल कोल्हेंवर पिंपरीतील नियोजित सभा रद्द करण्याची वेळ, ऐनवेळी परवानगी असूनही, त्यांचं हेलिकॉप्टर उड्डाणाला परवानगी नाकारली, त्यामुळे उमेदवाराचा फोनवरुनच प्रचार

पुणे- अजित पवारांनी उडवली भाजपच्या मित्र पक्षांची खिल्ली, आज भाजपचं फक्त वापरायचे आणि फेकून द्यायचेच काम चालूय म्हणत विनायक मेटे, महादेव जानकर यांच्या आवस्थेवर पवारांची बोचरी टीका

सोलापूर- आमचं सरकार निवडून द्या, पहिल्या तीन महिन्यात सातबारा कोरा करतो, अजित पवारांचं अश्वासन,  "मी चार वर्ष अर्थमंत्री होतो त्यामुळं मला अर्थकारण कळतं, " अशीही त्यांची स्पष्टोक्ती

रत्नागिरी- केंद्रीय मंत्री अनंत गीते यांची राष्ट्रवादीवर सडकून टीका, तटकरेंना भाजपने स्विकारलं नाही, त्यानंतर त्यांनी सेनेची वाट धरली, मात्र मातोश्रीवर मारलेल्या घिरट्या तटकरेंच्या कामी आल्या नसल्याचा गीतेंचा टोला 

सांगली- काँग्रेसला मतदान करा, भाजपच्या कमळाबाईला मतदान केलं तर नदीत फेकून देईन, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचा सांगलीकरांना इशारा, सांगलीच्या सभेत पाटलांचा विरोधकांवर घणाघात

मुंबई- इकबाल मिर्ची मालमत्ता विक्री प्रकरणी प्रफुल्ल पटेलांची आज पुन्हा ईडीकडून चौकशी, दक्षिण मुंबईतील बॅलार्ड पियर परिसरातील ईडीच्या कार्यालयात आज होणार चौकशी, पुरेशी दक्षात घेत पोलीस बंदोबस्त तैनात

सोलापूर- सावरकरांना भारतरत्न देण्यास प्रकाश आंबेडकरांचा विरोध, सावरकर म्हणजे एक माणूस पण दोन चेहरे असल्याची 
आंबेडकरांची टीका

मुंबई- सावरकरांच्या भारतरत्नप्रश्नी मनमोहन सिंहांचं मोठं वक्तव्य, सावरकरांच्या नावाला आमचा विरोध नाही, भारतरत्न कुणाला द्यावं हे सरकारच्या समितीने ठरवण्याचाही दिला सल्ला

बुलडाणा - एका अपक्ष उमेदवाराच्या बॅनरवर चक्क पंतप्रधान मोदी आणि एकनाथ खडसे यांचे फोटो, मतदारांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप, याचसंदर्भात तक्रारही दाखल

सोलापूर- बार्शीचे अपक्ष उमेदवार राजा राऊत यांच्याविरोधात महिलांचा मूक मोर्चा, भाजुप नेते मिरगणेंच्या पत्नीविषयी राऊत यांनी आक्षेपार्ह विधान केल्याबद्दल त्याविरोधात महिलांचा आंदोलनाचाही इशारा


अकोला- मोदींच्या सभेनंतर गुटखा प्रेमींची गुटखा पुड्या उचलण्यासाठी मोठी गर्दी, सभेआधी अंगझडतीमध्ये अनेकांच्या खिशातून तंबाखू, गुटखा पुड्या निघाल्या, त्या टाकून दिल्याने सभेनंतर तंबाखूप्रेमींची पडलेल्या पुड्या उचलण्यासाठी एकच धांदल

पुणे- निवडणुकीमुळे राज्यातील शाळांची दिवाळीची सुट्टी पुढे ढकलली, 21 ऐवजी 24 ऑक्टोबरपासून शाळांना दिवाळीची सुट्टी  जाहीर

गडचिरोली- जिल्यातील तीनही विधानसभा क्षेत्र नक्षलदृष्ट्या अतिसंवेदनशीलस, या क्षेत्राच्या विविध भागात पोलीस दलाकडून विश्वास निर्माण करण्यासाठी रूट मार्च 

अमरावती- निवडणूक आयोगाचा भोंगळ कारभार, तिवसा मतदार संघातील मोझरी गावातील मतदारांना वाटलेल्या मतदान स्लिपवर सहा तासांनी वेळ वाढवल्याचं उघड

वर्धा- वर्धा-यवतमाळ सीमेवर शस्त्रसाठा आणि दारु जप्त, विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक चौकात वाहनांची तपासणी

पालघर- सफाळेमध्ये गावठी बनावटीच्या तीन सिंगल बोर बंदूका जप्त, यासह नवीन बंदुका बनवण्याच्या नळ्या, 21 काडतुसं, 84 शिशाचे छर्रे, गावठी बनावटीची बंदूक बनवण्याचं साहित्य आढळलं, पालघर दहशतवादविरोधी पथकाची कारवाई 

मुंबई- वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवर भरधाव येणाऱा ट्रक उड्डाणपुलावरुन पडला खाली, ट्रकनं आधी रिक्षा आणि टॅक्सीला उडवलं, ड्रायव्हरसह अपघातात टक्सीमधील 4 जण जखमी, जखमींवर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या अपघातानंतर ट्रकचं मोठं नुक्सान झालंय. 

रत्नागिरी- दापोलीमध्ये तब्बल 90 हजार रुपयांचा गांजा जप्त, दोन संशयित ताब्यात, विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून चोख बंदोबस्त

पुणे- परिहार चौकातील नाकोडा ज्वेलर्समध्ये दरोडा, तब्बल 20 लाखांपर्यंतचा माल दरोडेखोरांनी केला लंपास

मुंबई- सोशल मीडियावर 'बँक ऑफ महाराष्ट्र'ची आर्थिक स्थिती डबघाईला आल्याची अफवा पसरवणाऱ्यांविरोधात तक्रार, बँकेच्या सायबर गुन्हे शाखेकडून तक्रार 


 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com