कॉंग्रेसच्या मुंबई अध्यक्षपदासाठी लॉबिंग

कॉंग्रेसच्या मुंबई अध्यक्षपदासाठी लॉबिंग

मुंबई  : मुंबई कॉंग्रेसच्या अध्यक्षपदासाठी 'लॉबिंग' सुरू झाले असताना अद्याप वरिष्ठ पातळीवरून कोणताही निर्णय झाला नसल्याचे समजते. त्यामुळे हे पद तूर्तास एकनाथ गायकवाड यांच्याकडेच राहाण्याची शक्‍यता आहे.

मुंबई कॉंग्रेसच्या अध्यक्षपदावर एकनाथ गायकवाड यांची सप्टेंबरमध्ये नियुक्ती करण्यात आली. त्यानंतर अवघ्या चार महिन्यांत कॉंग्रेसमधील वेगवेगळे गट सक्रिय झाले आहेत. डॉ. अमजितसिंह मनहास, माजी आमदार भाई जगताप आणि चरणसिंह सप्रा यांना हे पद मिळावे म्हणून हालचाली सुरू झाल्या आहेत.

कॉंग्रेसमधील गट महाराष्ट्राचे प्रभारी मल्लिकार्जुन खर्गे यांची भेट घेऊन आपलाच नेता मुंबई अध्यक्षपदासाठी योग्य असल्याचे पटवून देण्याचा प्रयत्न करत आहेत. परंतु, खर्गे थेट दिल्लीकडे हात दाखवत असल्याचे समजते. ते शिफारस घेऊन येणाऱ्या पदाधिकाऱ्यांना थेट पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांची भेट घेण्याचा सल्ला देत आहेत.

कॉंग्रेसचा मुंबई अध्यक्ष बदलण्याच्या कोणत्याही हालचाली वरिष्ठ स्तरावर अद्याप दिसत नाहीत. कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांचा राज्य मंत्रिमंडळात समावेश झाल्यानंतर नवा प्रदेशाध्यक्ष निवडला जाण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे मुंबई कॉंग्रेसचा अध्यक्ष बदलण्यासाठीही प्रयत्न सुरू झाले आहेत.


WebTittle ::  Lobbying Started for Mumabi Congress President Post
 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com