दिलासादायक ! गेल्या २४ तासात कोरोनाबाधित रुग्णांपेक्षा कोरोनामुक्त रुग्णांची संख्या जास्त 

covid19
covid19

सध्या महाराष्ट्रात Maharashtra कोरोना Corona विषाणूने थैमान घातले आहे. राज्यात गेल्या काही दिवसांपासून राज्यात मोठ्या प्रमाणात कोरोनाबाधितांची नोंद होत आहे. अशा परिस्थिथीत रुग्णसंख्या कमी व्हावी आणि साखळी तोडली जावी यासाठी राज्य सरकारनं निर्बंध घातले आहेत. आता ते निर्बंध १५ मे पर्यंत वाढवण्यात आले आहेत. असे असले तर एक दिलासादायक बातमी Good news समोर आली आहे. गेल्या २४ तासात राज्यात ६८,५३७ रूग्ण करोनामुक्त Corona free झाले आहेत. आतापर्यंत एकूण ३७,९९,२६६ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. In the last 24 hours, 68,537 patients were recovered 

याशिवाय गेल्या २४ तासात राज्यात  ६६,१५९ नव्या कोरोनाबाधितांची नोंद   झाली आहे तर ७७१ कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू Death झाला आहे .राज्यात आतापर्यंत एकूण ३७,९९,२६६ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. राज्यात सध्या ६,७०,३०१ अॅक्टिव्ह रुग्ण असून त्यांच्यावर उपचार सुरु आहे. तर राज्यातील रुग्ण बरे होण्याचा दर ८३.६९ टक्क्यांवर आला आहे.

राज्यात डॉक्टर्स Doctor, नर्स Nurse यांच्या प्रयत्नांमुळे रुग्ण कोरोनामुक्त होत आहेत. त्यामुळे दररोज कोरोनाबाधित रुग्णांच्या आकड्यात मोठी वाढ होत असली तरी कोरोनावर मात करणाऱ्यांची संख्या ही देखील मोठ्या प्रमाणत वाढली आहे. दरम्यान,राज्यात दिवसेंदिवस करोना रुग्णसंख्या वाढत आहे. मात्र दुसरीकडे कोरनामुक्त होणाऱ्यांच्या संख्येतही वाढ सुरू असल्याचे दिलासादायक चित्र समोर आले आहे.   

Edited By - Shivani Tichkule

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com