चीनची झोप उडवणार भारताची हेलिकॉप्टर्स

चीनची झोप उडवणार भारताची हेलिकॉप्टर्स

भारत आणि चीनच्या सीमेवर प्रचंड तणावाचं वातावरण निर्माण झालंय. भारतासोबत चर्चेचं नाटक करत चीननं सीमेवर सैन्याची कुमक वाढवलीय. इतकंच नाही तर चिनी सैन्य भारतात घुसण्याचा प्रयत्न करतंय. म्हणूनच भारताने लडाखसह सीमावर्ती भागांत तीन प्रकारची शक्तिशाली हेलिकॉप्टर्स सज्ज केलीयत.

पाहा व्हिडिओ -

भारताचं हेलिकॉप्टर्स 'त्रिशूल'
भारतीय सैनिकांच्या मदतीला तीन प्रकारची शक्तिशाली हेलिकॉप्टर्स तैनात केली गेलीयत. यामध्ये अॅडवान्स लाइट हेलिकॉप्टरचा समावेश करण्यात आलाय. अॅडव्हान्स लाइट हेलिकॉप्टर्स वजनाने हलकी असून शक्तिशाली समजली जातात. ही हेलिकॉप्टर्स प्रचंड थंडीत आणि बर्फाळ पर्वतरांगांमध्येही आकाशातून पाहारा देऊ शकतात. त्याचसोबत भारताकडून लाइट कॉम्बॅट हेलिकॉप्टर्सही सीमेवर तैनात करण्यात आलीयत. ही हेलिकॉप्टर्स अडचणीच्या ठिकाणी असलेल्या सैनिकांना मदत पोहोचवण्यासाठी सक्षम आहेत.

खरंतर, सैनिकांना रसद पोहोचवणं हे मोठं जिकरीचं काम असतं. रस्त्यांच्या माध्यमातून रसद पोहोचवताना शत्रूच्या हल्ल्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे, भारतीय लष्कराने सैनिकांच्या दिमतीला हेलिकॉप्टर्स दिल्याने आपलं सैन्यबळ आणखी सामर्थ्यवान झालंय. बर्फाळ पर्वतरांगांमध्ये जीवाची बाजी लावत पहारा देणाऱ्या सैन्याला हेलिकॉप्टर्सचा मोठा आधार मिळालाय. त्यामुळे, चिनी सैन्याने काही आगळीक केलीच तर त्यांना जशास तसं उत्तर देण्यासाठी भारतीय हेलिकॉप्टर्सचं त्रिशूळ सज्ज झालंय.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com