peacock
peacock

अवकाळी पावसानंतर बंचाप्पा बनात रंगली मयूर नृत्याची जुगलबंदी

सांगली - हो  मोर Peacock नाचतोय, सांगलीच्या Sangli पलूस तालुक्यातील बुर्ली येथील बंचाप्पा बनात. त्याचा केकारव सध्या बंचाप्पा बनात घुमत आहे. एकीकडे कोरोना लॉकडाऊनने आणि उकाड्याने जनता हैराण  आहे. तर दुसरीकडे रात्रीच्या अवकाळी पावसामुळे आणि आभाळातील ढगांनी मोरांना त्यांच्या विणीच्या हंगामाची आठवण करून दिली आहे. Jugalbandi of colorful peacock dance in Banchappa after rain

पावसाच्या Rain सुरुवातीला मोरांचा विणीचा हंगाम असतो. त्यामुळे साधारणपणे मे महिन्यापासून ते जून अखेरीपर्यंत लांबलचक पिसारा असणारे व पिसारा फुलवून नाचणारे मोर बंचाप्पा बनातील झाडाच्या आसपास दिसू लागतात. हे मोर मादीला आकर्षित करण्यासाठी पिसारा फुलवून नृत्य करत असतात. पाऊस आणि मोर यांचं नातं वेगळंच असतं. आकाशात ढगांची नक्षी जमल्या नंतर मोर जास्त खुश दिसतो पिसारा फुलवून थुई थुई नाचणाऱ्या मोरांची जुगलबंदी पाहायला मिळाली.

Edited By - Shivani Tichkule

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com