हिंदू महिलेवर अंत्यसंस्कार करून जमियत आणि मदनी ट्रस्टने दाखवल सामाजिक ऐक्य..

WhatsApp Image
WhatsApp Image

सांगली : कोरोनाने Corona माणुसकीच्या भिंती अभेद्य केल्या पण दुसरीकडं कोरोनाने मृत्यू झाल्यानंतर तिकडेच अत्यंविधी पार पाडा असा निरोप देताच मदनी चॅरिटेबल ट्रस्ट Madani Charitable Trust आणि जमियत उलेमा ए हिंदने Jamiat Ulema A Hind पुढाकार घेत हिंदू पध्दतीने या मृत महिलेचे अतिंमसंस्कार करत आपलं कर्तव्य पार पाडल आहे. Jamiat and Madani Trust showed social unity by cremating a Hindu woman.

कोरोनाच्या काळात मृत्यूमुखी Dead पडणाऱ्या मृतदेहाचे अंतिम संस्कार पार पाडणं म्हणजे एक दिव्यच झाल आहे. मरण्या अगोदर बेड Bed मिळत नाही, आणि मेल्या नंतर अंत्यसंस्कार Funeral करण्यात अडचण अशा विवंचनेत सापडलेल्या मृतांच्या नातेवाईकांना त्यांच्या कुटुंबातील सदस्य समजून सामाजिक कार्यकर्ते पुढं येत आहेत. 

सामाजिक संघटना मदनी चॅरिटेबल ट्रस्ट सांगली Sangali आणि जमियत उलेमा ए हिंद या संघटनेच्या कार्यकर्त्यांनी कोरोनाच्या संकटात सलग दुसऱ्या दिवशीही आपलं सामाजिक काम सुरूच ठेवलं आहे.  जिथे कोरोनाने कोणत्याही जाती धर्माच्या व्यक्तीची मयत झाली की, दफनविधी, अंत्यसंस्कार करण्यासाठी सहसा कोण पुढं येत नाही. अशीच घटना नागज सांगलीच्या कवठेमहांकाळ Kawthemahakal येथे घडली आहे. Jamiat and Madani Trust showed social unity by cremating a Hindu woman.

आजारी असलेल्या महिलेस मिरज Miraj सांगली मध्ये बेडसाठी फिरावे लागले, अखेर क्रीडा संकुल मिरज इथल्या कोविड Covid सेंटर मध्ये बेड मिळाल्यानंतर उपचार सुरू असताना, तिचा सायंकाळी पाच वाजता मृत्यू झाला. नांगज इथं मृतदेह नेण्याची तयारी झाली पण गावातल्या लोकांनी मृतदेह आणू नका तिकडेच अत्यसंस्कार करा असा निरोप दिला. 

मृतांच्या नातेवाईकांना मदनी ट्रस्ट आणि जमियत उलेमा ए हिंद या संघटनेच्या कार्यकर्त्यांना संपर्क करून मदनी ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष हाफिज सद्दाम सय्यद सचिव सुफियांन पठाण आणि मेहमूद मदनी गटाच्या जमियत उलेमा हिंद यांच्यासह कार्यकर्त्यांनी क्रीडासंकुल इथल्या कोविड सेंटर मध्ये जाऊन सदर महिलेलंच मृतदेह ताब्यात घेऊन, तिच्यावर हिंदू पद्धतीने मिरजेतील पंढरपूर रस्त्यावर असलेल्या स्मशानभूमीत अत्यसंस्कार करण्यात आले आहे. Jamiat and Madani Trust showed social unity by cremating a Hindu woman.

आतापर्यंत कोरोनाच्या काळात १५० हून अधिक मृतदेहाचे दफनविधी आणि ९ मृतदेहाचे अत्यंसंस्कार या दोन्ही संघटनेच्या वतीने कोणताही मोबदला न घेता मानवतावादी काम म्हणून केलं आहे. कोरोनाने जाती धर्माच्या भिंती पार मोडून काढल्या आहेत. सामाजिक ऐक्य अजूनही जिवंत असल्याचे दाखवून देत प्रत्यक्षात काम करत हे ऐक्य आणखी वृद्धिंगत केले आहे. मरण्या आधी आणि मरण्यानंतर मृतदेहाची हेळसांड होत असताना अत्यंसंस्कार आणि दफनविधी करून रमजानच्या पवित्र महिन्यात सांगलीच्या मदनी चॅरिटेबल ट्रस्ट आणि जमियत उलेमा ए हिंदने पुण्याई कमवत सामाजिक ऐक्याचे दर्शनही घडवलं आहे.

Edited By- digambar Jadhav 


 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com