इस्राईलने दिला हमासला दणका; हवाई हल्ल्यात १० म्होरके मारले

Israel Palestine War
Israel Palestine War

जेरुसलेम : गाझा पट्टीतून Gaza Strip रॉकेट हल्ले करणाऱ्या हमास या पॅलेस्टाइनमधील Palestine दहशतवादी संघटनेविरोधातील हवाई हल्ले इस्राईलने आणखी तीव्र केले आहेत. हमासच्या Hammas म्होरक्यांचे वास्तव्य असलेल्या इमारतींना लक्ष्य करत झालेल्या हवाई हल्ल्यांमध्ये Air Strike किमान १० मोठे म्होरके मारले गेल्याचा दावा इस्राईलने केला आहे. या नुकसानीनंतरही गाझा पट्टीतून डागल्या जाणाऱ्या रॉकेटची संख्या कमी झालेली नाही. Isarael Killed Ten Leaders of Hammas

इस्राईलने आज पहाटेपासूनच गाझा पट्टीत हवाई हल्ले केले. या हल्ल्यांमध्ये अनेक इमारतींचे नुकसान झाले. इस्राईलने विशेषत: हमासचे म्होरके रहात असलेल्या इमारतींवर हल्ले केले. यात अनेक उंच इमारती जमीनदोस्त झाल्या. यामध्ये हमासचे किमान १० म्होरके मारले गेले.

हे देखिल पहा - 

या संघर्षामुळे रमजान Ramadan असूनही गाझा पट्टीतील रस्त्यांवर शुकशुकाट होता. फक्त गाझा पट्टीतून डागल्या जाणाऱ्या रॉकेटचा आवाज सर्वत्र घुमत होता. क्षेपणास्त्रविरोधी यंत्रणा भेदून इस्राईलच्या शहरांवर अविरत कोसळणाऱ्या या रॉकेटमुळे इस्राईलमध्ये आज सात जणांचा मृत्यू झाला.

इस्राईल आणि पॅलेस्टाइनमधील संघर्षाचे सध्याचे स्वरुप आणि दोन्ही बाजूंकडून चढाओढीने होणारे हल्ले पाहता २०१४ मधील युद्धापेक्षाही मोठे नुकसान होण्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तविली आहे. जेरुसलेममधील वादानंतर गाझा पट्टी भागात सुरु झालेल्या संघर्षानंतर इस्राईलमध्येही ज्यू आणि अरब समुदायांमध्ये वादविवाद सुरु झाला आहे. Isarael Killed Ten Leaders of Hammas

तणाव टाळा : भारत
न्यूयॉर्क : इस्राईल आणि पॅलेस्टाइनमधील संघर्ष तातडीने थांबविण्याची आवश्‍यकता असल्याचे मत भारताने India संयुक्त राष्ट्रांमध्ये United Nations व्यक्त करत हिंसाचाराचा निषेध केला. विशेषत:, गाझा पट्टीतून होणाऱ्या रॉकेट हल्ल्यांबाबत भारताने नाराजी व्यक्त केली. काल (ता. १२) अशाच हल्ल्यामध्ये इस्राईलमधील भारतीय नर्सचा मृत्यू झाला होता.
Edited By - Amit Golwalkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com