मागील पाच वर्षांमध्ये जगातील भारताची प्रतिष्ठा वाढली : पंतप्रधान

मागील पाच वर्षांमध्ये जगातील भारताची प्रतिष्ठा वाढली : पंतप्रधान

नवी दिल्ली : देशातील 130 कोटी नागरिकांमुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताचा दबदबा निर्माण झाला असून, मागील पाच वर्षांमध्ये जगातील भारताची प्रतिष्ठा वाढली असल्याचे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मांडले.

अमेरिका दौऱ्यावरून मायदेशी परतलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आज सायंकाळी पालम विमानतळावर भव्य स्वागत करण्यात आले. मोदींनी या वेळी स्वागतासाठी जमलेल्या हजारो नागरिकांचे आभारही मानले. अमेरिका दौऱ्यावर भाष्य करताना मोदी म्हणाले की, "संयुक्त राष्ट्रांमध्ये 2014 मध्ये पहिल्यांदा भाषण केल्यानंतर जागतिक पातळीवर देशाच्या सन्मानामध्ये भर पडली होती, भारताप्रतीचा जगभरातील उत्साह वाढला असून, हे केवळ 130 कोटी भारतीयांमुळे शक्‍य झाले आहे. ह्युस्टनमधील अतिभव्य अशा "हाउडी मोदी' कार्यक्रमातून भारतीयांची ताकद दिसली. या कार्यक्रमाला अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्पदेखील उपस्थित होते. रिपब्लिकन आणि डेमोक्रॅट्‌स पक्षांच्या सदस्यांची उपस्थिती लक्षणीय ठरली.''

आजच्या भाषणामध्ये तीन वर्षांपूर्वी भारतीय सैनिकांनी 28 सप्टेंबर रोजी केलेल्या सर्जिकल स्ट्राइकलाही उजाळा दिला. भारताच्या शूर सैनिकांनी त्या वेळी देशाची ताकद आणि क्षमता दाखवून दिली होती, असे गौरवोद्‌गार मोदी यांनी काढले. 
 

Web Title: Indias Reputation rises around the world says PM Narendra Modi

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com