पाकिस्तानला चकवलं..20 विमान उडवून 12 विमानांनी केला हल्ला

पाकिस्तानला चकवलं..20 विमान उडवून 12 विमानांनी केला हल्ला

नवी दिल्ली : पाकव्याप्त काश्‍मीरमधील 'जैश ए महंमद'च्या प्रशिक्षण तळावर हल्ला करण्याची योजना अर्थातच अतिशय गोपनीय राखण्यात आली होती. पाकिस्तानला या हल्ल्याचा सुगावाही लागू नये, म्हणून हवाई दलाने चलाखीने ही योजना आखली. देशातील विविध तब्बल 20 तळांवरून 'मिराज' विमानांनी उड्डाण घेतले. त्यातील 12 विमानांनी पाकव्याप्त काश्‍मीरमध्ये घुसून ही कारवाई केली. 

भारतीय हवाई दलाने केलेल्या या कारवाईची माहिती आज (मंगळवार) सकाळी समोर आली. त्यानंतर हळूहळू आता या कारवाईसंदर्भातील तपशील समोर येत आहेत. भारतीय हवाई दलाच्या 'मिराज 2000' या लढाऊ विमानांनी हा हल्ला केला. एकूण 12 विमानांनी हा हल्ला केला. पण पाकिस्तानला या कारवाईचा सुगावा लागू नये म्हणून देशातील 20 विमानतळांवरून 'मिराज'च्या विमानांनी उड्डाण केले. एक विमान तर मध्य प्रदेशमधील ग्वाल्हेरवरून गेले होते, अशी माहिती समोर येत आहे. 

पुण्यातील हवाई दलाच्या तळावरूनही एक विमान या कारवाईसाठी गेले होते, असेही सांगितले जात आहे. अर्थात, यास अधिकृतरित्या पुष्टी मिळालेली नाही. अंबाला, ग्वाल्हेर आणि भटिंडा येथील तळांवरून प्रामुख्याने ही उड्डाणे झाली. एकूण 21 मिनिटे ही कारवाई सुरू होती. पहाटे 3.54 पासून या कारवाईला सुरवात झाली आणि आपले कुठलेही नुकसान न होऊ देता 21 मिनिटांमध्ये भारतीय विमाने देशात सुरक्षित परत आली.

Web Title: Indian Air force tricked Pakistan with 20 planes at a time

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com