पंधरा मिनिटांच्या पावसामुळे व्हीआयपी रस्ता गेला पाण्यात!

पंधरा मिनिटांच्या पावसामुळे व्हीआयपी रस्ता गेला पाण्यात!

खडकी बाजार : खडकी, वाकडेवाडी, मुळारोड परिसरात बुधवारी संध्याकाळी सहाच्या सुमारास पंधरा मिनिटे मुसळधार पाऊस झाला. या पावसामुळे मुळारोड सर्कल भोवती मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी साचल्याने सर्कलला तळ्याचे स्वरूप प्राप्त झाले होते.

पुढे काही अंतरावरही वॉर सिमेंट्री समोर ही नेहमी प्रमाणे संपूर्ण रस्त्यावर पाणी जमा झाल्यामुळे येथे वाहतुककोंडी झाली होती. मुळारोड येथील ही कायमस्वरूपी समस्येवर तोडगा काढावा, अशी प्रतिक्रिया मुळारोड येथील रहिवाशांनी व्यक्त केली.

व्हीआयपी समजला जाणारा मार्गावरील मुळारोड सर्कल व वॉर सिमेंट्री या दोन ठिकाणांवर थोडा जरी पाऊस पडला तरी मोठ्या प्रमाणात पाणी जमा होऊन येथे वाहतूककोंडी होते. ही समस्या गेल्या अनेक वर्षांपासून आहे. खडकी कॅन्टोन्मेंट आणि पुणे महापालिका यांच्या हद्दीच्या वादामुळे येथील रहिवाशांना याचा त्रास भोगावा लागत आहे.

दोन्ही ठिकाणी पावसाचे पाणी जाण्यासाठी मार्ग नसल्यामुळे पाणी मोठ्या प्रमाणात दोन दोन दिवसांपर्यंत रस्त्यावर तशाच अवस्थेत असते. याकडे प्रशासनाने जातीने लक्ष देऊन येथील समस्येवर तोडगा लवकरात लवकर काढावा, अशी मागणी मुळारोड येथील शिवसेनेचया करुणा घाडगे यांनी नागरिकांच्या वतीने केली आहे.


Web Title: heavy rain in Mula road and Khadaki Bazar area of Pune city

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com