मोदी येणार म्हणुन डंपिग ग्राऊंडवर अत्तराचे फवारे, तर स्मशानभूमीला टाळे

मोदी येणार म्हणुन डंपिग ग्राऊंडवर अत्तराचे फवारे, तर स्मशानभूमीला टाळे

कल्याण : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कल्याण दौऱ्यानिमित्त कल्याण शहर चकाचक करण्यात आले असताना सुरक्षेच्या कारणास्तव काही कठोर निर्णय घेण्यात आले आहेत. मोदी यांची सभा ज्या फडके मैदानावर होणार आहे तिथे जवळच लालचौकी स्मशानभूमी आहे. मात्र या स्मशानभूमीला आज टाळे ठोकण्यात आले आहे. मोदी यांची सभा दुपारी अडीच वाजता असून ते कल्याणच्या बाहेर जाईपर्यंत या स्मशानभूमित एकही अंत्यसंस्कार होणार नाही. असा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. 

दरम्यान, कार्यक्रमाच्या मार्गावरच वाधवा मंगल कार्यालय असून इथे आज तीन विवाह होणा होते. मात्र हे तीन्ही विवाह मोदी यांच्या सुरक्षेच्या कारणास्तव तडकाफडकी रद्द करण्यात आल्याने नवदांपत्याचा मुहूर्त हुकला आहे. 
फडके मैदानाच्या काही अंतरावरच गणेशघाट शेजारी शहराचे डंपिग ग्राऊंड आहे. या परिसरात दुर्गंधीचे साम्राज्य असते. या दुर्गंधीचा त्रास कार्यक्रामाला येणाऱ्या नागरिकांना बसू नये यासाठी अत्तराचे फवारे मारण्यात आले आहेत. 
दरम्यान कार्यक्रमाला येणार्यांनी काळे कपडे घातले असतील तर त्यांना मैदानात प्रवेश देवू नका अशा सूचनाही पोलिस प्रशासनाला देण्यात आल्या आहेत.

Web Title: Graveyard close down because Narendra Modi s rally in kalyan

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com