खुशखबर ! मेट्रोमध्ये भरती

खुशखबर ! मेट्रोमध्ये भरती

मुंबई: एमएमआरडीएने सध्या विविध मेट्रो मार्गांची कामे हाती घेतली आहेत. त्यापैकी काही मार्गांची बांधकामे सुरू झाली आहेत, तर काही मार्गांसाठी निविदा प्रक्रिया सुरू आहे. मेट्रोच्या सर्व मार्गांसाठी मोठ्या प्रमाणावर मनुष्यबळाची आवश्यकता आहे. त्यातही प्रामुख्याने इंजिनीअर, स्टेशन मॅनेजर, ट्रॅफिक कंट्रोलर, सेफ्टी सुपरवायझर, तंत्रज्ञ, मनुष्यबळ बळ विकास विभाग, वित्त आदी १०५३ पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू आहे. ९ सप्टेंबरपासून अर्ज मागवण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. आतापर्यंत ३५ हजारपेक्षा जास्त अर्ज प्राप्त झाले आहेत. ५ ऑक्टोबरपर्यंत अर्ज स्वीकारले जाणार आहेत. त्यामुळे अर्जाचा आकडा ७५ हजारपर्यंत जाण्याची शक्यता आहे. इच्छुक उमेदवारांची लेखी परीक्षा घेतली जाणार आहे.

साधारणपणे दोन वर्षांपूर्वीही एमएमआरडीएने काही पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू केली होती पण ती प्रक्रिया नंतर बारगळली. त्यावेळी फक्त एमएमआरडीए कार्यालयीन पदांसाठी भरती होती


सरकारी नोकर भरती अजून सुरू नाही. मंदीमुळे रोजगार कमी झाल्याची चर्चा आहे. अशा वेळी कुठे नोकरीची दारे किलकिली झाली की इच्छुकांच्या उड्या पडताना दिसतात. एमएमआरडीएच्या नोकरभरतीत याचे प्रत्यंतर येऊ लागले आहे.

काही मेट्रो प्रकल्प २०२१ पर्यंत पूर्ण होतील,तर काही त्यानंतर. साधारणपणे २०२५पर्यंत सर्व प्रकल्प कार्यान्वित करण्याचा एमएमआरडीएचा इरादा आहे. प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर मनुष्यबळाची गरज भासणार आहे. मेट्रो व्यवस्थापन व ऑपरेशन हा मुख्य भाग असल्याने तांत्रिक स्वरूपाची पदे खूप आहेत. सर्व मेट्रो प्रकल्पांचे व्यवस्थापन एकाच छताखाली होणार असून त्याकरिता मेट्रो भवन उभारले जात आहे. आरे कॉलनीत ३२ मजल्याचे भवन उभारले जाणार आहे.


 

WebTittle: Good news! Recruitment in the Metro


 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com