आता एसटी बसने करा मोफत प्रवास  

 आता एसटी बसने करा मोफत प्रवास  

मुंबई: लॉकडाऊनमुळे राज्यात विविध ठिकाणी अडकलेले नागरिक तसेच विद्यार्थ्यांना त्यांच्या गावी परत जाण्यासाठी काही अटींवर एसटीतर्फे येत्या सोमवारपासून मोफत बस सेवा सुरू होणार आहे, असे नमूद करत परिवहन राज्यमंत्री सतेज पाटील यांनी या व्यवस्थेबाबतचा तपशील दिला आहे.


१.जे नागरिक वैयक्तिक जाऊ इच्छितात त्यांनी एस. टी. महामंडळाने तयार केलेल्या ऑनलाइन पोर्टलद्वारे नाव नोंदणी करायची आहे. हे पोर्टल सोमवारपासून चालू होईल. ऑनलाइन अर्ज करतेवेळी, आपण सध्या ज्या जिल्ह्यात वास्तव्य करत आहात, त्या जिल्ह्यातील जिल्हाधिकारी यांची परवानगी जोडणे आवश्यक आहे.

२.  या प्रवासादरम्यान, प्रवाशांनी मास्क घालणे, बसमध्ये चढतेवेळी हात सॅनिटायझरने स्वच्छ करणे बंधनकारक आहे. बस निघण्यापूर्वी व पोहचल्यानंतर सॅनिटाइज केली जाईल.

 ३. ही पॉइंट टू पॉइंट सेवा आहे. प्रवासात मध्येच कुठे प्रवासी उतरणार नाही किंवा चढणार नाहीत. लांब पल्याच्या गाड्या कुठेही जेवणासाठी थांबणार नाहीत, त्यामुळे आपले अन्नपाणी घरूनच घेऊन यावे, तसेच फक्त सॅनिटाइज केलेली महामंडळाचीच प्रसाधनगृहे वापरली जातील.

४.  सोशल डिस्टन्सिंग नियमानुसार प्रत्येक सीटवर एक प्रवासी असेल. अशाप्रकारे एका बसमध्ये साधारणपणे २१ ते २२ लोक बसू शकतील. त्यामुळे जर २१-२२ लोकांचा एक ग्रुप तयार झाला, तर त्या ग्रुपने आपल्या ग्रुप लिडरच्या नावासह, सर्वांची नावे, संपूर्ण पत्ता, जिथे जायचे आहे तेथील पत्ता, आधार कार्ड नंबर असा फॉर्म भरून शहरी भागामध्ये पोलीस आयुक्त कार्यालय व ग्रामीण भागामध्ये जिल्हाधिकारी/ तहसीलदारांकडे जमा करावा. ज्या जिल्ह्यामध्ये ते जाणार आहेत, त्या जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी आल्यानंतर त्यांना एस.टी. कधी व कोठून जाणार आहे, याबद्दलची माहिती कळविण्यात येईल.

५.  ज्या जिल्ह्यांमध्ये हे प्रवासी जाणार आहेत तिथे त्यांची तपासणी करून संस्थात्मक किंवा घरीच विलगीकरण करण्याचे अधिकारी त्या त्या नोडल अधिकारी यांच्याकडे असतील.


६. कंटेनमेंट झोनमधील नागरिकांना कोणतीही सुविधा उपलब्ध नाही. 

ही सुविधा फक्त लॉकडाऊन संपेपर्यंतच असणार आहे. त्यामुळे योग्य माहिती भरून आपापल्या घरी परत जा, कृपया पोलीस कार्यालयांमध्ये, जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये, बस स्टॅन्ड किंवा रस्त्यावर गर्दी करू नये, असे आवाहन सतेज पाटील यांनी केले आहे.

WebTittle :: Get free travel by ST bus now


 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com