औषधाचे अनधिकृत वितरण केल्याबद्दल गौतम गंभीर फाउंडेशन दोषी

gautam gambhir
gautam gambhir

दिल्ली सरकारच्या औषध नियंत्रकांनी गुरुवारी उच्च न्यायालयात सांगितले की, कोविड -१९ रुग्णांच्या उपचारासाठी वापरल्या जाणाऱ्या फॅबीफ्लू या औषधाचे अनधिकृत होर्डिंग, खरेदी आणि वितरण केल्याबद्दल गौतम गंभीर फाउंडेशन दोषी आढळले आहे. फाउंडेशन, औषध विक्रेत्यांविरूद्ध उशीर न करता कारवाई केली पाहिजे, असे औषध नियंत्रक म्हणाले.  ड्रग्ज नियंत्रकांनी उच्च न्यायालयात सांगितले की, ड्रग्स आणि कॉस्मेटिक्स कायद्यांतर्गत आमदार प्रवीण कुमार यांनाही अशाच गुन्ह्यांमध्ये दोषी ठरवले आहे. न्यायालयाने ड्रग नियंत्रकांना सहा आठवड्यांत या प्रकरणांच्या सद्यस्थिती अहवाल सादर देण्याचे निर्देश दिले व पुढील सुनावणीसाठी २९ जुलै ही तारीख निश्चित केली. (Gautam Gambhir Foundation convicted for unauthorized distribution of drugs)

विशेष म्हणजे, कोविड -१९ च्या उपचारात वापरल्या जाणाऱ्या औषधांची कमतरता असताना 25 मे रोजी दिल्ली उच्च न्यायालयाने औषध नियंत्रकांना राजकारण्यांकडून मोठ्या प्रमाणात खरेदी केलेल्या औषधांच्या प्रकरणाची चौकशी करण्याचे निर्देश दिले आहेत.  

हे देखील पाहा 

भाजपा खासदार गौतम गंभीर चांगल्या हेतूने औषधे वाटप करीत आहेत, पण त्यांच्या याच भावनेने त्यांची बदनामी केली, अशी टीका न्यायालयाने केली आहे. दिल्ली उच्च न्यायालयाने औषध नियंत्रकांना  आदेश दिले की ''आपचे आमदार प्रीती तोमर आणि प्रवीण कुमार यांना ऑक्सिजन जमा करण्याच्या आणि विकत घेण्याच्या आरोपाच्या चौकशीसाठी आणि सध्याच्या परिस्थितीचा अहवाल देण्यास सांगितले आहे.

न्यायालयाने म्हटले आहे की, "गौतम गंभीर यांनी चांगल्या हेतूने ते केले. आम्हाला त्यांच्या हेतूबद्दल शंका नाही. तो आमच्या देशाचा राष्ट्रीय खेळाडू आहे.  परंतु, आमचा प्रश्न असा आहे की जेव्हा आपल्याला माहित होते की औषधांची कमतरता आहे.  हे जबाबदार वर्तन आहे का, खरं तर हा एक अविचारीपणा होता, जरी तो अनावधानाने घडला असेल. बाजारातून एवढे औषधे खरेदी करण्याचा हा मार्ग नाही, नक्कीच नाही.

Edited By : Pravin Dhamale

ताज्या बातम्यासाठी भेट द्या
Website - https://www.saamtv.com/
Twitter - https://twitter.com/saamTVnews
Facebook- https://www.facebook.com/SaamTV
ताज्या व्हिडिओंसाठी पहा
युट्यूब - https://www.youtube.com/channel/UC6cxTsUnfSZrj96KNHhRTHQ
टेलिग्राम - https://t.me/SaamNews

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com