नाशिकमध्ये रंगली हजारोंची 'रासक्रीडा'...

NASIK GARBA RAS
NASIK GARBA RAS

आपण आतापर्यंत गरबा, रासलीला यांचा अनुभव घेतला असणार... पण कधी 'रासक्रीडा'बाबत ऐकलंय का?
उगाच डोक्यात कीडा वळवळला असणार ना...? पण इथे आम्ही तुम्हाला सांगतोय ती 'रासक्रीडा' वेगळी आहे...
तर आम्ही सांगत असलेल्या 'रासक्रीडे'चा अनुभव घ्यायचा असेल, तर तुम्हाला नाशिकमध्ये जाणं भाग आहे... 

अध्यात्मिकतेची जोड असलेल्या नाशकात, नुकताच 'रासक्रीडा' हा उत्सव पार पडला...
या पुण्यभूमीत हजारोंच्या संख्येनं जमलेल्या भाविकांनी रासचक्र उचलण्याच्या अनोख्या परंपरेत सहभाग नोंदवला..
आता तुम्ही विचाराल हे रासचक्र म्हणजे काय ? तर रासचक्र म्हणजे,
केळीची पानं आणि झेंडूच्या फुलांनी सजवलेलं आकर्षक चक्र...
हा रासचक्र उचलण्यासाठी मोठी गर्दी होते... त्यामुळे या रासचक्र उचलण्याच्या स्पर्धेचा भाविक 'रासक्रीडा' असा उल्लेख करतात...

नाशकातल्या या रासक्रीडेला तब्बल 700 वर्षांची वैभवशाली परंपरा आहे... मुल्हेर गावात अश्विन पौर्णिमेला हा उत्सव पार पडतो...
पारंपरिक पद्धतीने 25 फुटांचा रासचक्र, दोरीच्या सहाय्याने तयार करण्यात येतो... यावेळी जमलेले हजारो भाविक "उद्धव महाराजां"चा जयघोष करत 
रासचक्र स्तंभावर चढवतात... उद्धव महाराजांचे गुरु काशिराज महाराज यांच्या जयंतीनिमित्तानं या उत्सवाचं आयोजन 
करण्यात येतं... तर मग दरवर्षी रंगणाऱ्या या अध्यात्मिक 'रासक्रीडा' सोहळ्याला तुम्ही कधी हजेरी लावताय...!


 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com