petorl diesel.jpg
petorl diesel.jpg

इंधन दरवाढीचा भडका; राज्यसह देशभरात असंतोषाची लाट  

नवी मुंबई : देशात इंधनदरवाढीमुळे Fuel price hike प्रचंड तणाव निर्माण झाला आहे.  राज्यसह देशभरात पेट्रोल डिझेलने Petrol diesel  शंभरी पार केली आहे. ज्यामुळे नागरिकांमध्ये असंतोष पसरला आहे. ठिकठिकाणी याचे पडसाद उमटू लागले आहेत.  पुणे, मुंबई सारख्या शहरांसह राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्येही इंधनाने शंभरी पार केली आहे. त्याचबरोबर दिल्ली, चेन्नई,  कलकत्ता यांठिकाणी देखील इंधनाच्या दराचा भडका उडाला आहे. 27 फेब्रुवारी 2021 रोजी सरकारी तेल कंपन्यांनी डिझेच्या दरात 17 पैसे प्रति लिटर दरवाढ झाल्यानंतर मार्च-एप्रिलदरम्यान डिझेल 74 पैसे प्रति लिटर स्वस्त झालं होतं. मे महिन्याच्या अखेरीस डिझेल  4.37 रुपये प्रति लिटर महाग झालं आहे.  (Fuel price hike; Dissatisfaction across the country, including the state) 

राज्यातील इंधनदरवाढ 
पुण्यात पेट्रोलचा दर 100.15 रुपये असून डिझेलसाठी प्रति लिटर 90.71 रुपये  इतका झाला आहे. तर  मुंबईत पेट्रोल 100.47 रुपये प्रती लिटर तर डिझेलची किंमत 92.45 रुपये प्रति लिटर इतकी झाली आहे.  राज्यात परभणी जिल्ह्यात तर इंधन दरवाढीचा भडकच उडाला आहे.  परभणीत पेट्रोल प्रति लिटर 102. 85 पैसे  प्रति लिटर,  तर डिझेल  93.32  प्रति लिटर इतके झाले आहे. तर अहमदनगर मध्ये पेट्रोलचा दर 100.25 पैसे प्रति लिटर इतका तर डिझेल 90.81 रुपये मोजावे लागत आहेत. त्याचबरोबर कोल्हापुरातही पेट्रोल 100.05 पैसे प्रति लिटर इतके झाले आहे.  

देशातील प्रमुख शहरांमधील इंधनाचे दर 
राज्याची राजधानी दिल्लीत आज पेट्रोलचा दर 94.23 रुपये तर डिझेलचा दर 85.15 रुपये प्रति लिटर आहे.  तर कोलकाता मध्ये जयपूरमध्ये पेट्रोल 100.75 रुपये आणि डिझेल 93.05 रुपये प्रति लिटर वर पोहचले आहे. 

असे निश्चित केले जातात पेट्रोल डिझेलचे दर 
देशभरात दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीमध्ये बदल होतात. दररोज सकाळी सकाळी 6 वाजल्यापासून संपूर्ण देशात नवीन दर लागू केले जातात. उत्पादन शुल्क, डीलर कमिशन आणि इतर गोष्टी जोडून पेट्रोल डिझेलच्या किमती दुप्पट होतात. परदेशी विनिमय दरासह आंतरराष्ट्रीय बाजारातील क्रूडच्या दरावरून पेट्रोल आणि डिझेलचे दर दररोज बदलत राहतात. पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किंमतींचा परिणाम  इतर अत्यावश्यक गोष्टींवर होत असतो. त्यामुळे दररोज बदलणाऱ्या पेट्रोल डिझेलच्या किंमतीवर सर्वसामान्य नागरिकांचे लक्ष असते.

Edited By - Anuradha Dhawade 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com