अठरा वर्षावरील सर्वाना मिळणार मोफत लस; मोदींची घोषणा

narendra modi.jpg
narendra modi.jpg

नवी दिल्ली : देशात कोविड 19 Covid 19 ची लाट हळूहळू ओसरू लागली आहे. मात्र तिसऱ्या लाटेचा धोकादेखील अद्याप कमी झालेला नाही.  अशातच देशातील काही राज्यांनी आता कोविड 19 ची परिस्थिति पाहता लॉकडाऊनच्या Lockdawn  नियमांमध्ये शिथिलता आणली आहे. महाराष्ट्रात देखील कोरोना नियमांमध्ये शिथिलता आणली आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी PM Narendr Modi  देशवासियांना संबोधित केले.  (Free vaccines for everyone over the age of 18; Modi's announcement) 

काय बोलले पंतप्रधान नरेंद्र मोदी? 

- यावेळी बोलताना त्यांनी देशातील दुसऱ्या लाटेतील परिस्थितीवर भाष्य केले. देश बर्‍याच काळापासून करीत असलेल्या निरंतर प्रयत्न व परिश्रमांमुळे आगामी काळात लसीचा पुरवठा आणखी वाढणार आहे. आज देशातील 7 कंपन्या वेगवेगळ्या प्रकारच्या लस तयार करत आहेत. त्याचबरोबर आणखी तीन लसींची चाचणीही प्रगत टप्प्यात  असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. 

- यावर्षी 16  जानेवारीपासून एप्रिल अखेरपर्यंत भारतात लसीकरण कार्यक्रम मुख्यत्वे केंद्र सरकारच्या देखरेखीखाली चालू होता. सर्वांना मोफत लस उपलब्ध करून देण्याच्या मार्गावर देश पुढे जात आहे. तर देशातील नगरीकदेखील शिस्त पाळत असून त्यांची वेळ आल्यावर  स्वतःचे लसीकरण करून घेत आहेत. 

- आज हा निर्णय घेण्यात आला आहे की, लसीकरणाशी संबंधित 25 टक्के कामांची जबाबदारीही भारत सरकार घेईल. येत्या 2 आठवड्यांत ही व्यवस्था लागू केली जाईल. या दोन आठवड्यांत केंद्र आणि राज्य सरकार एकत्रितरित्या  नव्या मार्गदर्शक सूचनांनुसार आवश्यक तयारी करतील.

- सोमवार, २१ जूनपासून देशातील प्रत्येक राज्यात  18 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या सर्व नागरिकांना केंद्र सरकारच्या वतीने  राज्यांना मोफत लस उपलब्ध करुन देईल. भारत सरकार स्वतः लस उत्पादकांकडून एकूण लस उत्पादनापैकी 75 टक्के खरेदी करेल आणि ते राज्य सरकारांना मोफत देईल. 

Edithed By- Anuradha Dhawade 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com