भारताचे माजी कसोटीपटू माधव आपटे यांचे निधन

 भारताचे माजी कसोटीपटू माधव आपटे यांचे निधन

मुंबई: माजी कसोटीपटू माधव आपटे यांचे मुंबईत आज सकाळी (सोमवार) वृद्धापकालाने निधन झाले. ते ८६ वर्षांचे होते. आपटे यांनी सन १९५२ ते १९५३ या कालावधीत ७ कसोटी सामन्यांमध्ये भारताचे प्रतिनिधीत्व केले आहे. त्यांनी 'क्रिकेट क्लब ऑफ इंडिया'चे अध्यक्ष म्हणूनही जबाबदारी सांभाळलेली आहे.

आपटे यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात १९४८ साली केली. ते फलंदाज म्हणून प्रसिद्ध असले तरी त्यांची सुरुवात मात्र फिरकी गोलंदाज म्हणूनच झाली होती. एल्फिन्स्टन कॉलेजमघ्ये शिकत असताना त्यांनी विनू मंकड यांच्याकडून गोलंदाजीचे धडे घेतले. त्यांनी सर डॉन ब्रॅडमन यांना त्यांच्या शेवटच्या इनिंमध्ये १०० ची सरासरी घेण्यापासून रोखले होते. ते १९ वर्षांचे असताना त्यांनी मेरीलबोन क्रिकेट क्लब विरुद्ध भारतीय विद्यापीठांचे प्रतिनिधीत्व केले होते. हेच त्यांचे प्रथम दर्जाच्या क्रिकेटमधील पदार्पण होते.

Web Title: former indian cricketer madhav apte passed away in mumbai
 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com